Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Sonet Facelift : 6 एअरबॅग आणि ADAS ने सज्ज असणार किआची नवीन Sonet SUV, किंमत असणार फक्त…

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येणार असून लवकरच ही कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. तसेच कारचे बुकिंग देखील सुरु झाले आहे.

0

Kia Sonet Facelift : किआ कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत. तसेच आता किआ त्यांची आणखी एक नवीन एसयूव्ही कार सादर करणार आहे.

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Sonet एसयूव्हीचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. तुम्हालाही नवीन किआ sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल खरेदी करायचे असेल तर 25 हजार रुपये टोकन रक्कम भरून बुकिंग करू शकता.

किआ कार उत्पादक कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे की, जे ग्राहक अगोदर बुकिंग करतील त्यांना नवीन मॉडेल लवकरच वितरित केले जाईल. 15 डिसेंबर रोजी भारतात किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार लॉन्च केली जाईल.

किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत, कारच्या केबिनमध्ये काही कॉस्मेटिक बदल केले जाणार आहेत. नवीन फ्रंट आणि रियर बंपर आणि हेडलाइट सेटअपसह किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार सादर केली जाईल. तसेच कारमध्ये नवीन डिझाइन टेल लाईट सेटअप देखील पाहायला मिळेल.

किआ Sonet फेसलिफ्ट नवीन वैशिष्ट्ये

किआ कार कंपनीकडून Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन लेआउट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, ऑटो डिमिंग IRVM, ऑटो क्लायमेट कंट्रोल, नवीन बोस साउंड सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अॅम्बियंट लाइटिंग आणि इतर अनेक नवीन वैशिष्ट्ये दिली जाणार आहेत.

किआ Sonet फेसलिफ्ट ADAS ने सुसज्ज असेल

किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स दिले जाणार आहेत. ही कार लेव्हल-1 ADAS सुरक्षा वैशिष्ट्यांसह सादर केली जाईल. कारमध्ये 6 एअरबॅग्ज, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, ABS, ESC आणि अनेक नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये दिली जातील.

किआ Sonet फेसलिफ्ट इंजिन

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन कायम ठेवली जाऊ शकतात. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड IMT आणि 7 स्पीड DSG गिअरबॉक्सशी जोडलेली असतील.

किआ Sonet फेसलिफ्ट किंमत

किआ Sonet एसयूव्ही कारच्या सध्याच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.89 लाख रुपयांपर्यंत जाते. नवीन Sonet एसयूव्ही कारची किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 50-60 हजार रुपयांनी महाग असू शकते.