Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Sonet vs Maruti Brezza कोणती आहे बेस्ट SUV? पहा किंमत, फीचर्स आणि सर्वकाही…

0

Kia Sonet vs Maruti Brezza : किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार अलीकडेच लाँच करण्यात आली आहे. या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच काही नवीन फीचर्स देखील जोडले आहेत.

किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारशी स्पर्धा थेट मारुती सुझुकीच्या लोकप्रिय एसयूव्ही कार ब्रेझाशी आहे. आता एसयूव्ही कार खरेदी करताना अनेकांना ब्रेझा की Sonet कोणती एसयूव्ही बेस्ट पर्याय आहे असा प्रश्न पडला असेल. चला तर जाणून घेऊया…

Kia ​​Sonet फेसलिफ्ट मध्ये काय खास आहे?

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. तसेच डिझाईनमध्ये देखील बदल पाहायला मिळत आहे.

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार 8 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच कारमध्ये ADAS सारखे जबरदस्त सुरक्षा वैशिष्ट्ये देखील देण्यात आले आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. कारमध्ये

मारुती सुझुकी ब्रेझा इंजिन

मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्याय देण्यात आला आहे. ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर नैसर्गिकरित्या पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

हे इंजिन 103 bhp आणि सुमारे 130 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ब्रेझा एसयूव्ही कारचे इंजिन इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा आणि किआ Sonet फेसलिफ्ट किंमत

मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.14 लाख रुपये आहे.

तर किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.69 लाख रुपये आहे.

ब्रेझा वैशिष्ट्ये

ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, चार स्पीकर, पॅडल शिफ्टर्स (स्वयंचलित प्रकार), सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर, हेड्स-अप डिस्प्ले आणि 360 डिग्री कॅमेरा अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Sonet फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 6 एअरबॅग्ज, 10 स्वायत्त फंक्शन्ससह सुसज्ज लेव्हल 1 प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम, 10.25-इंच स्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हिंग्लिश व्हॉइस कमांडसह इलेक्ट्रिक सनरूफ, स्मार्ट प्युअर एअर प्युरिफायर अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.