Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Upcoming Cars : बजेट तयार ठेवा! Kia लॉन्च करणार सोनेट आणि कार्निवल कारचे अपडेटेड मॉडेल, होणार हे मोठे बदल

किआ कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या दोन कार अपडेटेड फीचर्ससह भारतीय ऑटो बाजारात पुन्हा एकदा लॉन्च करण्यात येणार आहेत. या कारमध्ये धमाकेदार फीचर्स जोडले जाणार आहेत.

0

Kia Upcoming Cars : किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच किआने त्यांच्या Seltos SUV चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. या कारचे बुकिंग जोरदार सुरु आहे.

Seltos SUV कारमध्ये कंपनीकडून कॉस्मेटिक बदल, नवीन वैशिष्ट्ये आणि नवीन 1.5L टर्बो पेट्रोल इंजिनसह अनेक अपडेटेड फीचर्स दिले आहेत. आता कंपनीकडून अपडेटेड सोनेट सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि कार्निव्हल एमपीव्ही कार लॉन्च केली जाणार आहे.

किआ सोनेट एसयूव्ही कारचे अपडेटेड मॉडेल पुढील काही महिन्यांत बाजारात येण्याची अपेक्षा आहे, तर नवीन कार्निव्हल पुढील वर्षी लॉन्च होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

kia sonet 2023 

kia sonet एसयूव्ही कारच्या नवीन मॉडेलची सध्या चाचणी सुरु आहे. या कारच्या डिझाईनमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे. कारच्या नवीन स्पाय पिक्चर्स समोर आले आहेत की नवीन सोनेटला ड्युअल-टोन (बेज आणि ब्लॅक) अपहोल्स्ट्री, एक नवीन पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एक अपडेटेड क्लायमेट कंट्रोल मॉड्यूल मिळेल.

नवीन सोनेट कारला ADAS, 360-डिग्री कॅमेरा हे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होणार नाही. सध्या कारमध्ये 1.2L नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.0L टर्बो पेट्रोल आणि 1.5L टर्बो डिझेल इंजिन दिले जात आहे. हेच इंजिन पुढे दिले जाणार आहे. ही कार Tata Nexon, Mahindra XUV300 आणि Hyundai Venue सारख्या कारशी स्पर्धा करते.

2024 किआ कार्निव्हल

किआ कार्निव्हल कार पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लॉन्च करणार आहे. कारमध्ये L-आकाराचे हेडलॅम्प आणि टेललॅम्प, अद्ययावत पुढील आणि मागील बंपर आणि नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे. ही कार 2023 ऑटो एक्सपोमध्ये हे KA4 म्हणून प्रदर्शित करण्यात आली होती.

कार्निव्हल कारमध्ये 2.2L स्मार्टस्ट्रीम टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 199bhp पॉवर आणि 450Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार ADAS तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. कारमध्ये इंफोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी ड्युअल 12.3-इंच स्क्रीन देण्यात येईल.