Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Upcoming EV Car : किआ लॉन्च करणार जबरदस्त 7 सीटर EV कार, केवळ 25 मिनिटांत होणार 80% चार्ज

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची ७ सीटर कार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर केली जाणार आहे. या कारमध्ये धमाकेदार फीचर्स देण्यात येणार आहेत.

0

Kia Upcoming EV Car : किआ कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमधील विस्तार वाढवण्यासाठी अनेक नवनवीन कार सादर करत आहे. आता किआ कार कंपनीकडून त्यांची 7 सीटर EV कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे.

Kia कडून त्यांची EV9 इलेक्ट्रिक SUV 2024 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीकडून या कारच्या बेस मॉडेलची किंमत देखील जाहीर करण्यात आली आहे. किआकडून या इलेक्ट्रिक कारची संकल्पना २०२३ च्या ऑटो एक्स्पो दिल्लीमध्ये सादर करण्यात आली होती.

किआ EV9 इलेक्ट्रिक SUV नवीन इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर तयार करण्यात आली आहे. किआने EV9 या इलेक्ट्रिक कारच्या बेस मॉडेलची किंमत USD 54,900 ठेवली आहे म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 45.66 लाख रुपये असेल.

Kia EV9 eSUV ही अमेरिकेतील सर्वात स्वस्त 7 सीटर इलेक्ट्रिक SUV आहे. किमतीनुसार Kia EV9 Lite RWD हे व्हेरियंट लोकांसाठी एक चांगला पर्याय बनला आहे. लवकरच ही भारतात देखी सादर केली जाणार आहे.

25 मिनिटांत 10% ते 80% चार्ज

किआ EV9 इलेक्ट्रिक SUV मध्ये 19 इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. ही कार हे E-GMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्म 800V आर्किटेक्चर आहे जे DC फास्ट चार्जिंग क्षमतेसह येते. Kia चा दावा आहे की ते सुमारे 25 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज होते.

एसयूव्ही डिझाइन आणि डायमेंशन

किआ EV9 इलेक्ट्रिक SUV मध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कारची लांबी 5,008 मिमी आणि व्हीलबेस 3,099 मिमी आहे. Kia EV9 चा व्हीलबेस आगामी मर्सिडीज-बेंझ ई क्लास LWB पेक्षा थोडा मोठा आहे.

किआ इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे?

EV9 इलेक्ट्रिक SUV च्या इंटीरियरमध्ये 2+2+2 सीटिंग कॉन्फिगरेशन आहे. इन्फोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी ट्विन 12.3-इंच स्क्रीन कारमध्ये देण्यात आल्या आहेत. कारमध्ये आकर्षक अलॉय व्हील डिझाइन, मोठे एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, ट्विन सनरूफ, टायगर-नोज ग्रिल, फ्लश डोअर हँडल एलिमेंट देण्यात आले आहे.

सुरक्षा वैशिष्ट्ये आणि ते कोणाशी स्पर्धा करेल?

EV9 इलेक्ट्रिक कार प्रगत ADAS सारख्या उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. कारमध्ये क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट अलर्ट आणि स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंगसह अनेक फीचर्स देण्यात येत आहेत. भारतात लॉन्च झाल्यावर, Kia EV9 मर्सिडीज-बेंझ EQB 3-थ्री SUV ला टक्कर देईल, ज्याची एक्स शोरूम किंमत सुमारे 77.5 लाख रुपये आहे.