Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Largest Boot Space Cars In India : Amaze, Nexon आणि बलेनोसह या आहेत देशातील मोठी बूट स्पेस असलेल्या स्टायलिश कार्स! किंमत 5.47 लाखांपासून सुरु

मोठ्या बूट स्पेस असलेली स्टायलिश कर खरेदी करायची असेल तर ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या शानदार कार उपलब्ध आहेत. या कारमध्ये मोठ्या बूट स्पेसह जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Largest Boot Space Cars In India : प्रत्येकजण नवीन कार खरेदी करत असताना कारच्या फीचर्स आणि इतर सर्व गोष्टींबद्दल जाणून घेत असतात. फॅमिलीसोबत फिरायला जात असताना प्रत्येकाला मोठी बूट स्पेस असलेली कार खरेदी करायची असते.

तुम्हालाही मोठ्या बूटस्पेसह शानदार कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी भारतीय ऑटो बाजारात अनेक आकार उपलब्ध आहेत. Amaze, Nexon आणि बलेनोसह इतर आणखी कारमध्ये मोठी बूट स्पेस उपलब्ध आहे.

होंडा अमेझ

होंडा कार कंपनीकडून त्यांच्या अमेझ सेडान कारमध्ये मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.05 लाख रुपये आहे. या कारमध्ये 420 लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 18.6 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये स्वयंचलित आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे.

ह्युंदाई ऑरा

ह्युंदाई कार उत्पादक कंपनीची ऑरा सेडान कार देखील मोठ्या बूट स्पेससाठी उत्तम पर्याय आहे. कारमध्ये 402 लीटरची बूट स्पेस उपलब्ध आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे

मारुती बलेनो

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या बलेनो कारमध्ये देखील 318 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते. कारमध्ये 1.2 ड्युअल जेट VVT पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

किआ सोनेट

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Sonet एसयूव्ही कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7.79 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 392 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे.

टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची Nexon Facelift एसयूव्ही कार भारतात सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये 350 लीटरची बूट स्पेस उपलब्ध आहे. तसेच या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ८.१० लाख रुपये आहे. या कारला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.