Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Magnite Kuro Edition : भारतात लॉन्च झाले Magnite SUV चे नवीन एडिशन, पहा खास फीचर्स आणि किंमत

भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केली जात आहेत. आता Magnite SUV कारचे नवीन एडिशन लॉन्च करण्यात आले आहे.

0

Magnite Kuro Edition : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कार खरेदी करण्याचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या नवनवीन शानदार एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करत आहेत. निसान कार उत्पादक कंपनीने देखील त्यांच्या शानदार एसयूव्ही कारचे नवीन एडिशन लॉन्च केले आहे.

Nissan कार उत्पादक कंपनीने त्यांच्या Magnite एसयूव्ही कारचे Kuro Edition भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. ही कार MT, Turbo MT आणि Turbo CVT अशा तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

Nissan Magnite Kuro Edition किंमत आणि रंग

Nissan Magnite Kuro Edition ही नवीन एसयूव्ही कार संपूर्ण काळ्या रंगात सादर केली आहे. यात ब्लॅक फ्रंट ग्रिल, स्किड प्लेट, रूफ रेल, ब्लॅक फिनिशरसह हेडलॅम्प आणि लाल ब्रेक कॅलिपरसह ऑल-ब्लॅक अलॉय व्हील देण्यात आले आहेत. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.27 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.46 लाख रुपये आहे.

डिझाईन कशी आहे?

Nissan कार कंपनीकडून मॅग्नाइट कारचे नवीन मॉडेल सादर करण्यात आले आहे. कारच्या डिझाईनमध्ये फारसा काही फरक पहायला मिळत नाही. ही कार पूर्णपणे काळया रंगामध्ये पाहायला मिळत आहे. कारचे अलॉय व्हील्स देखील काळया रंगात देण्यात आले आहे.

मॅग्नाइट Kuro Edition इंजिन किती शक्तिशाली आहे?

मॅग्नाइट Kuro Edition या नवीन एसयूव्ही कारमध्ये 1.0-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल देण्यात आले आहे. हे इंजिन 71 bhp आणि 96 Nm पीक पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देखील देण्यात आले आहे. हे इंजिन 99 bhp पॉवर आणि 152 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कारमध्ये CVT पर्याय देखील देण्यात आला आहे.

कारचे इंटीरियर खूप खास आहे

मॅग्नाइट कारच्या नवीन व्हेरियंटचे इंटेरियर डिझाईन पूर्णपणे बदलण्यात आले आहे. कारच्या इंटेरियरमध्ये कुरो एडिशनला वेगळे इन्स्ट्रुमेंट पॅनल, तसेच ब्लॅक इंटीरियर अॅक्सेंट आणि ब्लॅक डोअर ट्रिम इन्सर्ट देण्यात आले आहे. डॅशबोर्ड, सेंटर कन्सोल, सीट्स आणि अपहोल्स्ट्री मोनोटोन आहे. 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत.

तुम्हाला ही खास वैशिष्ट्ये मिळतील

मॅग्नाइट Kuro Edition मध्ये तुम्हाला 360-डिग्री कॅमेरा, मागील एसी व्हेंट्ससह फ्रंट सेंटर आर्मरेस्ट, कुरो-थीम फ्लोअर मॅट्स, वायरलेस चार्जर आणि विस्तृत IRVM अशी खास फीचर्स देण्यात आले आहेत.