Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra 5-Door Thar : 5-डोअर थार लवकरच करणार एन्ट्री! चाचणीदरम्यान झाली स्पॉट, पहा कशी दिसते नवीन थार आणि काय मिळणार खास फीचर्स…

नवीन थार 5-डोअर लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. कंपनीकडून या कारची चाचणी घेतली जात आहे. ही कार चाचणी दरम्यान दिसली आहे.

0

Mahindra 5-Door Thar : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो बाजारात त्यांची शक्तिशाली ऑफ रोडींग एसयूव्ही कार थार सादर केल्यानंतर ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता लवकरच कंपनीकडून 5-डोअर थार लाँच केली जाणार आहे.

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची थार एसयूव्ही सर्वाधिक लोकप्रिय बनली आहे. या शक्तिशाली आणि स्टायलिश एसयूव्ही कार खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. महिंद्राकडुन गेल्या काही दिवसांपूर्वी 5-डोअर थार एसयूव्ही कारवर काम सुरु केले आहे.

महिंद्राची लोकप्रिय एसयूव्ही थारचे 5-डोअर व्हर्जन चाचणी दरम्यान स्पॉट झाले आहे. त्यामुळे तुम्हीही आता थार एसयूव्ही कारचे 5-डोअर व्हर्जन लवकरच ऑटो मार्केटमध्ये पाहू शकता. कंपनीकडून याबाबत लवकरच खुलासा केला जाईल.

महिंद्रा थार 5 डोअर

अलीकडेच शक्तिशाली महिंद्रा थार 5 डोअर एसयूव्ही कारची चाचणी घेण्यात आली आहे. त्यावेळी या कारचे काही फोटो लीक झाले आहेत. नवीन थार कारमध्ये नवीन एलईडी हेडलाइट्स आणि हॅलोजन हेडलॅम्प्स दिसू शकतात. रिंग आकाराच्या डीआरएलसह एलईडी युनिट कारमध्ये दिले जाऊ शकते.

डिझाईन

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ३ डोअर थारवर महिंद्राकडून काम सुरु केले आहे. ही कार लवकरच ५ डोअरमध्ये सादर केली जाणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या थार कारच्या तुलनेपेक्षा नवीन कारमध्ये अनेक शानदार वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. थार ५ डोअरला नवीन हेडलाइन, फ्रंट आर्मरेस्ट, सनग्लासेस होल्डर आणि इलेक्ट्रिक सनरूफ मिळू शकते.

इंजिन

नवीन थार ५ डोअर एसयूव्ही कारमध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन देण्यात येऊ शकते. हे इंजिन 128 HP पॉवर जनरेट करेल. तर 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देखील देण्यात येईल जे 150 HP पॉवर जनरेट करेल. हे इंजिन स्वयंचलित आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह ऑफर केले जाईल.

नवीन कारमध्ये 4×4 सोबत पर्यायी 4×2 कॉन्फिगरेशन मिळण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या थार एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.98 लाख ते 16.94 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र नवीन थारची किंमत यापेक्षा जास्त असू शकते.