Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra Bolero Neo : Nexon किंवा Brezza नाही तर स्वस्तात खरेदी करा महिंद्राची ही पॉवरफुल कार! पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सच्या Nexon एसयूव्ही कारचे डिझेल व्हेरियंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण याच किमतीमध्ये तुम्ही महिंद्राची ७ सीटर कार खरेदी करू शकता.

0

Mahindra Bolero Neo : नवीन कार खरेदीदारांमध्ये सध्या एसयूव्ही कार खरेदी करण्याचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे अनेक कार कंपनीनकडून एसयूव्ही कार निर्मितीवर अधिक भर दिला जात आहे. मात्र काही वेळा बजेट कमी असल्यामुळे आवडती कार खरेदी करता येत नाही.

अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांची जबरदस्त सुरक्षा फीचर्स असलेली Nexon कार सादर केली आहे. या कारची किंमत 8 लाख ते १२ लाखांपर्यंत आहे. मात्र तुम्ही या बजेटमध्ये एक शानदार कार खरेदी करू शकता.

तुमचे बजेट १२ लाख रुपयांपर्यंतचे असेल तर तुम्ही महिंद्राची शानदार शक्तिशाली एसयूव्ही कार खरेदी करू शकता. टाटा मोटर्सचे Nexon चे Pure S डिझेल व्हेरियंट खरेदी करण्यास गेल्यास तुमच्याकडे 11.50 लाख रुपये असणे आवश्यक आहे.

महिंद्रा बोलेरो निओची वैशिष्ट्ये

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची बोलेरो निओ ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही एक ७ सीटर कार आहे. कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, उंची समायोजित करण्यायोग्य ड्रायव्हर सीट, कीलेस एंट्री, महिंद्रा ब्लूसेन्स कनेक्टिव्हिटी अॅप, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ नियंत्रणे अशी वैशिष्ट्ये दिली जात आहेत.

तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बोलेरो निओ ७ सीटर कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड माऊंट, ABS-EBD, रियर पार्किंग सेन्सर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि क्रूझ कंट्रोल सारखी मानक फीचर्स देण्यात येत आहेत.

महिंद्रा बोलेरो निओ इंजिन

महिंद्राच्या बोलेरो निओ या कारमध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 100 bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

महिंद्रा बोलेरो निओ किंमत

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून बोलेरो निओ ही कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ही कार N4, N8 N10 आणि N10(O) या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.63 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.14 लाख रुपये आहे.