Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

महिंद्राची ‘ही’ नवीन बाईक बुलेटला हद्दपार करून टाकेल, पहा थक्क करणारे फीचर्स व किंमत

महिंद्राने बुलेटलाच टक्कर द्यायचं ठरवलं आहे. त्यापेक्षाही चांगली बाईक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. दमदार इंजिनसोबतच या बाईकमध्ये अनेक भन्नाट फीचर्सही मिळणार आहेत, जे तरुणांना महिंद्राच्या बाईककडे आकर्षित करतील.

0

Mahindra BSA Gold Star 650 Bike : भारतात अशा अनेक बाईक्स आहेत कि ज्यांची तरुणाईमध्ये जास्त जबरदस्त क्रेझ आहे. यात बुलेटचे नाव टॉपवर येते. परंतु आता बुलेटचीही क्रेझ, प्रियता हळूहळू कमी होत आहे. कारण अनेक कंपन्यांनी त्यांच्यापेक्षा चांगल्या बाईक बनवायला सुरुवात केली आहे. आता बुलेटला टक्कर देण्यासाठी महिंद्राने नवीन बाईक बनवण्यास सुरुवात केली आहे.

महिंद्राने यापूर्वीही अनेक बाईक लाँच केल्या आहेत, ज्या लोकांना खूप आवडल्या होत्या. पण आता महिंद्राने बुलेटलाच टक्कर द्यायचं ठरवलं आहे. त्यापेक्षाही चांगली बाईक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. दमदार इंजिनसोबतच या बाईकमध्ये अनेक भन्नाट फीचर्सही मिळणार आहेत, जे तरुणांना महिंद्राच्या बाईककडे आकर्षित करतील.

 

Mahindra BSA Gold Star 650 Bike
महिंद्रा बीएसए गोल्ड स्टार 650 ही बाईक महिंद्रा लॉन्च करणार आहे. कंपनी यावर अद्याप काम करत आहे. बाईक अद्याप लाँच करण्यात आलेला नसली तरी लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिंद्रा बीएसए गोल्ड स्टार 650 बाईकसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स आणि त्याची किंमत.

Mahindra BSA Gold Star 650 Bike चे इंजिन
कंपनीने बुलेटला टक्कर देऊ शकणाऱ्या महिंद्रा बीएसए गोल्ड स्टार 650 बाईकची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्यांनी या मोटारसायकलला सिंगल सिलिंडर आणि चार व्हॉल्व्हसह येणारे शक्तिशाली 652cc चे इंजिन दिले आहे. महिंद्राने या बाइकमध्ये वापरलेले इंजिन लिक्विड कूल इंजिन आहे.

हे इंजिन 44bhp पॉवर आणि 55nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या बाईकच्या इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले आहे. याशिवाय कंपनीने या बाईकमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे लोकांचे लक्ष या बाईककडे वेधले जात आहे.

Mahindra BSA Gold Star 650 Bike ची किंमत
महिंद्रा बीएसए गोल्ड स्टार 650 बाईक बुलेटला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे, त्यामुळे त्याची किंमत त्यापेक्षा कमी असणार नाही. सध्या कंपनीने या बाईकच्या किंमतीबाबत काहीही सांगितलेले नाही, परंतु असा अंदाज आहे की जेव्हा ही मोटारसायकल लाँच केली जाईल तेव्हा त्याची किंमत 3 लाख रुपयांपर्यंत असू शकते.