Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra & Mahindra : ऑगस्टमध्ये बोलेरो, XUV700, थारची बत्ती गुल ! ग्राहकांनी ‘या’ कारला घेतले डोक्यावर, जाणून घ्या गेल्या महिन्यातील बेस्ट सेलर कार

सध्या लोक Mahindra & Mahindra च्या कार मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. ज्यामध्ये बोलेरो, XUV700, थार अशा या कार आहेत.

0

Mahindra & Mahindra : देशात महिंद्रा ही कंपनी बाजारात अनेक नवनवीन आलिशान कार लॉन्च करत आहे. जर तुम्हीही Mahindra & Mahindra चे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

कारण आज आम्ही तुम्हाला Mahindra & Mahindra साठी ऑगस्ट महिना कसा गेला व मागच्या महिन्यात कंपनीच्या कोणत्या कारची सर्वाधिक विक्री झाली याबाबत सांगणार आहे.

कंपनीने YoY आधारावर 26% आणि MoM आधारावर 3% ची वाढ साधली आहे. यावेळी स्कॉर्पिओ हे कंपनीसाठी सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल ठरले. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर बोलेरो ही कार आहे.

जुलैमध्येही स्कॉर्पिओ ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही होती. मात्र, महिंद्राची एकही कार 10 हजार युनिट्सचा टप्पा पार करू शकली नाही. मात्र ऑगस्ट मधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ऑगस्ट 2022 च्या तुलनेत कंपनीच्या सर्व मॉडेल्सना YoY वाढ मिळाली.

विक्रीचा ब्रेकअप डेटा जाणून घ्या

गेल्या महिन्यात महिंद्राच्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर स्कॉर्पिओच्या 9898 युनिट्सची विक्री झाली होती. ऑगस्ट 2022 मध्ये हा आकडा 7,056 युनिट होता. कंपनीच्या एकूण विक्रीच्या 26.56% बाजाराचा हिस्सा होता. यामध्ये बोलेरोच्या 9092 युनिट्सची विक्री झाली.

तर ऑगस्ट 2022 मध्ये हा आकडा 8246 युनिट होता. XUV700 चे 6,512 युनिट्स विकले गेले. ऑगस्ट 2022 मध्ये हा आकडा 6,010 युनिट होता. थारच्या 5951 युनिटची विक्री झाली.

तर ऑगस्ट 2022 मध्ये हा आकडा 3793 युनिट होता. XUV300 चे 4,992 युनिट्स विकले गेले. ऑगस्ट 2022 मध्ये हा आकडा 4,322 युनिट होता. XUV400 च्या 778 युनिट्सची विक्री झाली. Marazzo च्या 47 युनिट्स विकल्या गेल्या. ऑगस्ट 2022 मध्ये हा आकडा 45 युनिट होता.

तसेच जुलैमध्ये स्कॉर्पिओच्या 10,522 युनिट्सची विक्री झाली, तर ऑगस्टमध्ये 9,898 युनिट्सची विक्री झाली. त्याचप्रमाणे जुलैमध्ये बोलेरोच्या 8,921 युनिट्सची, तर ऑगस्टमध्ये 9,092 युनिटची विक्री झाली. XUV700 ने जुलैमध्ये 6,176 युनिट्सची विक्री केली, तर ऑगस्टमध्ये 6,512 युनिट्सची विक्री झाली.

जुलैमध्ये थारमध्ये 5,265 युनिट्सची विक्री झाली, तर ऑगस्टमध्ये 5,951 युनिटची विक्री झाली. XUV300 ने जुलैमध्ये 4,533 युनिट्सची विक्री केली, तर ऑगस्टमध्ये 4,992 युनिट्सची विक्री झाली. XUV400 चे 707 युनिट्स जुलैमध्ये विकले गेले, तर ऑगस्टमध्ये 778 युनिट्सची विक्री झाली. जुलैमध्ये मराझोच्या 81 युनिट्सची विक्री झाली, तर ऑगस्टमध्ये 47 युनिटची विक्री झाली आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ची वैशिष्ट्ये

जर कंपनीच्या Scorpio N या कारबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये क्रोम फिनिशिंग दिसत आहे. कंपनीचा नवीन लोगो ग्रिलवर दिसत आहे. त्यामुळे कार पुढील बाजूने अतिशय आकर्षक दिसते.

यामध्ये नवीन डिझाइन केलेले एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवीन फॉग लॅम्प हाउसिंगसह पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट बंपर, सी-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, हेक्सागोनल लोअर ग्रिल इन्सर्टसह विस्तीर्ण सेंट्रल एअर इनलेट यांचा समावेश आहे.

तसेच यात नवीन डॅश आणि सेंटर कन्सोल, अपडेटेड सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, रूफ-माउंटेड स्पीकर, लेदर सीट्स, अॅडजस्टेबल हेडरेस्ट, वायरलेस चार्जिंग पॅड, सेंट्रली माउंटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल.

या कारमध्ये प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी, सनरूफ, 6 एअरबॅग्ज, रिव्हर्स कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, क्रूझ कंट्रोल आणि रिअर डिस्क ब्रेक अशी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.