Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra SUVs : महिंद्राच्या या शक्तिशाली SUVs खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी! खरेदीपूर्वी जाणून घ्या प्रतीक्षा कालावधी…

महिंद्राच्या लोकप्रिय एसयूव्ही कार खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला त्यावर काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यानंतरच तुम्ही या कार घरी घेऊन जाऊ शकता.

0

Mahindra SUVs : महिंद्रा कार निर्मात्या कंपनीकडून एकापेक्षा एक दमदार कार भारतीय ऑटो बाजारपेठेत सादर केल्या आहेत. महिंद्राच्या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिंद्राकडून नेहमीच दक्षिण आणि शक्तिशाली कार्स सादर केल्या जात आहेत.

महिंद्राच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील वाढ होत आहे. Scorpio N, Thar आणि XUV 700 सारख्या महिंद्राच्या SUV चा प्रतीक्षा कालावधी देखील मोठा आहे. तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घेईला लागेल.

Mahindra Scorpio N व्हेरियंटचा प्रतीक्षा कालावधी

महिंद्रा Scorpio N कारचे Z2 व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर तुम्हाला ही कार खरेदी करण्यासाठी 30 आठवडे वाट पाहावी लागेल. Scorpio N च्या Z4 हे व्हेरियंट खरेदी करण्यासाठी 45 आठवडे प्रतीक्षा करावी लागेल. Scorpio N च्या Z6 व्हेरियंटसाठी 40 आठवड्यांपर्यंत, Z8 व्हेरियंटसाठी 50 आठवड्यांपर्यंत आणि Z8L व्हेरियंटसाठी 50 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

XUV 700

महिंद्रा कार कंपनीकडून भारतीय ऑटो बाजारात त्यांची XUV 700 ही एसयूव्ही कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही SUV 700 ची बुकिंग करणार असाल तर त्याआधी कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल.

XUV 700 एसयूव्हीचे MX व्हेरियंट खरेदी करण्यासाठी ४० आठवडे, AX3 व्हेरियंट खरेदी करण्यासाठी ४० आठवडे, AX5 व्हेरियंट खरेदी करण्यासाठी 40 आठवड्यांपर्यंत, AX7 व्हेरियंटवर 22 आठवड्यांपर्यंत आणि AX7L व्हेरियंटवर 30 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

महिंद्रा थारसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल

महिंद्राची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही Thar खरेदी करण्यासाठी देखील ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागेल. थारचे 4WD व्हेरियंट खरेदी करण्यासाठी २४ आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागेल. रियर व्हील ड्राइव्ह व्हेरियंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 70 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.