Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra Thar 5 Door : महिंद्रा थार खरेदी करणाऱ्या साठी एक वाईट बातमी ! हे व्हायला नको तेच होणार..

तुम्हीही नवीन महिंद्रा थार 5 डोअर ऑगस्टमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण कंपनीकडून ऑगस्ट महिन्यामध्ये महिंद्रा थार 5 डोअर लॉन्च करण्यात येणार नाही.

0

Mahindra Thar 5 Door : महिंद्रा कंपनीच्या अनेक कार सध्या भारतीय ऑटो बाजारात ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. तसेच महिंद्रा कंपनीची ऑफ रोडींग कार थार गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक विकली जात आहे. ग्राहकांचा या कारला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

महिंद्रा कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या थार कारची किंमत अधिक असल्याने अनेकांना ती कार खरेदी शक्य होत नाही. हेच कारण पाहता आता कंपनीकडून लवकरच महिंद्रा थार 5 डोअर कार लॉन्च करण्यात येणार आहे.

महिंद्रा थार 5 डोअर ऑगस्टमध्ये लॉन्च होणार असल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र आता कंपनीकडून महिंद्रा थार 5 डोअर कधी लॉन्च होणार आहे याबाबत एक पोस्ट जारी केली आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये महिंद्रा थार लॉन्च होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महिंद्रा कंपनीकडून इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की ऑगस्टमध्ये नाही तर २०२४ मध्ये महिंद्रा थार 5 डोअर लॉन्च केली जाऊ शकते. त्यामुळे ऑगस्टमध्ये महिंद्रा थार 5 डोअर लॉन्च होणार अशी वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी आहे.

महिंद्रा थार 5 डोअर कारची सध्या कंपनीकडून चाचणी सुरु आहे. महिंद्रा थार 5 डोअर दोन पर्यायी इंजिनसह लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.2-लिटर डिझेल इंजिनसह ही कार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या महिंद्रा 3 डोअर थार मॉडेल बाजारात उपलब्ध आहे. या मॉडेलपेक्षा अनेक वेगळे फीचर्स या कारमध्ये देण्यात येतील. महिंद्रा 3 डोअर थार मॉडेलमध्ये वर्तुळाकार हेडलाइट्स येतात. मात्र आता महिंद्रा थार 5 डोअरमध्ये आयताकृती हेडलाइट्स देण्यात येणार आहेत. तसेच अलॉय व्हील्सचे डिझाईन देखील बदलले जाऊ शकते.

महिंद्रा थार 5 डोअर स्वयंचलित गिअरबॉक्ससह देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. महिंद्रा थार 5 डोअर केवळ 2WD प्रणालीसह लॉन्च केली केली जाऊ शकते.

महिंद्रा थारला भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने 1 लाख उत्पादनाचा टप्पाही ओलांडला आहे. महिंद्रा कंपनीने हा आकडा 30 महिन्यांत गाठला असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या बाजारात असलेली महिंद्रा थार कार 2 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलिया आहे. सध्या थार कार AX आणि LX या दोन मॉडेलमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.