Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra Thar 5-Door : थार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! 2024 मध्ये लॉन्च होणार 5-Door Thar! शक्तिशाली इंजिनसह होणार हे मोठे बदल

महिंद्रा कार निर्मात्या कंपनीकडून २०२४ मध्ये थार प्रेमींना मोठे गिफ्ट दिले जाणार आहे. त्यांची 5-Door Thar नवीन बदलांसह बाजारात लॉन्च केली जाणार आहे.

0

Mahindra Thar 5-Door : महिंद्रा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही कार थारचे नवीन मॉडेल लवकरच बाजारात लॉन्च केले जाणार आहे. त्यामुळे थार खरेदीदारांना आता 5-Door Thar व्हेरियंट खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

तुम्हालाही थार एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी लवकरच 5-Door Thar बाजारात येत आहे. त्यासाठी तुम्ही थोडी प्रतीक्षा करू शकता. 5-Door Thar अनेकदा चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. 2024 च्या मध्यापर्यंत 5-Door Thar बाजारात येऊ शकते.

5-Door Thar डिझाईन

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या थार कारमध्ये अनेक मोठे बदल केले जाणार आहेत. नवीन थार एसयूव्ही कार 3 डोअर थारपेक्षा वेगळी असणार आहे. 15 ऑगस्‍ट 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेमध्‍ये सादर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक थारवरून ५ डोअर थार प्रेरित असू शकते.

चाचणी दरम्यान ५ डोअर थार कारचे प्रोजेक्टर हेडलॅम्प, अद्ययावत फ्रंट लोखंडी जाळी आणि अद्यतनित एलईडी डीआरएल दिसले आहेत. मोठ्या साइड स्टेप्स, पिलर-माउंटेड हँडलसह नवीन डिझाइन अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात. LED टेललॅम्प क्लस्टरच्या समावेशासह कार सादर केली जाणार आहे.

5-Door Thar इंटेरियर

5-Door Thar कारच्या इंटेरियरमध्ये देखील बदल केले जाणार आहेत. नवीन थार एसयूव्ही कारमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. तसेच सिंगल-पेन सनरूफ, मागील पार्किंग कॅमेरा, नवीन फ्रंट आर्मरेस्ट आणि पुन्हा डिझाइन केलेले सेंटर कन्सोल देखील दिला जाऊ शकतो.

5-Door Thar पॉवरट्रेन

5-Door Thar एसयूव्ही कारमध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लीटर टर्बो डिझेल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. नवीन थारचे पेट्रोल इंजिन 200bhp पॉवर आणि 370Nm/380 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असू शकते.

तर डिझेल इंजिन 172bhp पॉवर आणि 370Nm/400 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिला जाऊ शकतो. 4X4 आणि 4X2 अशा दोन्ही ड्राइव्हट्रेन पर्याय दिले जाणार आहेत.