Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra Thar 5 Door : थारचे 5 डोअर व्हर्जन लॉन्च करण्यासाठी महिंद्रा सज्ज! होणार हे मोठे बदल

महिंद्रा थारचे ५ डोअर व्हर्जन लवकरच भारतीय ऑटो मार्केट गाजवण्यासाठी सादर केले जाऊ शकते. या कारवर कंपनीकडून वेगाने काम सुरु करण्यात आले आहे.

0

Mahindra Thar 5 Door : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची ऑफ रोडींग एसयूव्ही कार थार गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात ३ डोअर थार मॉडेल बाजारात उपलब्ध आहे.

मात्र आता महिंद्रा कार कंपनीकडून आता थार एसयूव्ही कारचे ५ डोअर मॉडेल लवकरच बाजारात लॉन्च केले जाणार आहे. या कारवर कंपनीकडून वेगाने काम सुरु केले आहे. कारला मिळणारा प्रतिसाद पाहता आता महिंद्राकडून 2024 मध्ये थारचे 5 डोअर व्हर्जन लॉन्च केले जाऊ शकते.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये ही कार नवीन फीचर्स आणि मोठ्या बदलांसह लॉन्च केली जाणार आहे. तसेच कारच्या किमतीतही बदल केला जाऊ शकतो. मात्र कारमध्ये इंजिन सध्याच्या कारसारखेच दिले जाऊ शकते.

येत्या नवीन वर्षात २०२४ मध्ये महिंद्रा थारचे 5 डोअर व्हर्जन लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीकडून या कारवर वेगाने काम सुरु केले आहे. थारचे 5 डोअर अनेकदा रस्त्यावर चाचणी दरम्यान दिसून आली आहे. कारचे काही फोटो आणि फीचर्स लीक झाले आहेत. त्यावरून अंदाज लावता येत आहे की कारमध्ये काय बदल होणार आहेत.

5-डोअर महिंद्रा थार

महिंद्रा थार 5-डोअरला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो असा दावा केला जात आहे. कारच्या फीचर्स आणि इतर काही बदल केले जाणार आहेत. नवीन थारमध्ये लांब व्हीलबेससह मागील बाजूस अधिक जागा असण्याची शक्यता आहे. तसेच कारला मोठा बूट स्पेस देखील मिळू शकतो. अलॉय व्हीलचे डिझाईन देखील नवीन स्वरूपात पाहायला मिळू शकते.

महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

महिंद्रा कार निर्मात्या कंपनीकडून त्यांची XUV300 फेसलिफ्ट एसयूव्ही कार लवकरच सादर केली जाणार आहे. या कारमध्ये देखील अनेक बदल केले जाणार आहेत. कारमध्ये शक्तिशाली टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 130 PS पॉवर आणि 230 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असू शकते.