Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra Thar CNG : मस्तच! पेट्रोल डिझेल नाही तर CNG मध्ये चालवा थार, ६०० रुपयांमध्ये धावणार १२५ किमी, पहा व्हिडिओ

महिंद्रा थार कमी मायलेज देते त्यामुळे अनेकजण खरेदी करत नाहीत. ही कार पेट्रोल आणि डिझेल ईंजिनसह बाजारात उपलब्ध आहे. मात्र एका थार चालकाने त्याची थार सीएनजीमध्ये बदलली आहे.

0

Mahindra Thar CNG : महिंद्रा थार या ऑफ रोडींग SUV कारची देशात एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. तरुणांपासून ते राजकारण्यांपर्यंत या कारची क्रेझ पाहायला मिळते. महिंद्रा थार पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

सध्या या कारला अनेकजण मॉडिफिकेशन करून घेत आहेत. यामध्ये नवीन अलॉय व्हील्स आणि आणखी सामग्रीचा समावेश आहे. मात्र आता एका व्हिडीओनुसार एका थार एसयूव्ही मालकाने चक्क थारला सीएनजीमध्ये रूपांतरित केले आहे. दिल्लीमधील एका थार चालकाने सीएनजी किट बसवून घेतले आहे.

थार सीएनजी एसयूव्ही कारचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. थार सीएनजी जबरदस्त मायलेज देत असल्याचा दावा थार चालकाने केला आहे. त्यामुळे तुम्ही देखील मार्केटमधून थारला सीएनजी किट बसवून घेऊ शकता.

महिंद्रा थार पेट्रोल व्हेरियंट फक्त 10 kmpl मायलेज देत आहे. त्यामुळे अनेकांना पेट्रोल महिंद्रा थार कार चालवणे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही देखील या कारमध्ये सीएनजी किट बसवून ही कार आरामात चालवू शकता. कारमध्ये बसवण्यात आलेले सीएनजी किट पोलंडवरून मागवण्यात आले आहे.

महिंद्रा थारमध्ये सीएनजी किट बसवल्यामुळे कार जबरदस्त मायलेज देते असा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. ही कार ६०० रुपयांमध्ये १२५ किमी धावेल असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे थार कारमध्ये सीएनजी किट बसवणे फायदेशीर ठरू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे ऑटोमॅटिक पेट्रोल थार एसयूव्हीमध्ये सीएनजी किट बसवण्यात आले आहे.

महिंद्रा थार किंमत

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची थार एसयूव्ही कार गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.98 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16.94 लक्ष रुपयांपर्यंत जाते.

महिंद्रा थार इंजिन

थार ऑफ रोडींग एसयूव्ही कारमध्ये दोन डिझेल इंजिन आणि एक पेट्रोल इंजिन देण्यात आले आहेत. 2184 cc आणि 1497 cc डिझेल इंजिन देण्यात आले आहे. तर 1997 cc पेट्रोल इंजिन कारमध्ये देण्यात आले आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ही कार उपलब्ध आहे. तसेच कारमध्ये ६०० लिटरची बूट स्पेस देखील देण्यात आली आहे.