Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra Thar EV : महिंद्राची शक्तिशाली थार अवतरणार इलेक्ट्रिक रूपात! सिंगल चार्जमध्ये देणार इतकी मोठी रेंज

महिंद्रा थार ५ डोअर लाँच केल्यांनतर आता थारचे इलेक्ट्रिक मॉडेल देखील लवकरच भारतात सादर केली जाण्याची शक्यता आहे. कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाईल.

0

Mahindra Thar EV : महिंद्राबी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही कार थारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये पाहायला मिळेल. थार इलेक्ट्रिक एसयूव्ही कार दक्षिण आफ्रिकेतील फ्युचरस्केप इव्हेंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

महिंद्रकडुन येत्या काळात त्यांच्या अनेक एसयूव्ही कार देखील सादर केल्या जाणार आहेत. यामध्ये एका स्कॉर्पिओ एन आधारित ग्लोबल पिक अप देखील सादर केला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत महिंद्राने त्यांची Ther.e कार सादर केली आहे.

महिंद्रा कार उत्पादक कंपनीने त्यांची थार एसयूव्ही कार २०२० मध्ये सर्वात प्रथम भारतात सादर केली होती. सध्या ही कार ३ डोअर व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली असून लवकरच कारचे ५ डोअर व्हर्जन देखील लाँच केले जाणार आहे. त्यानंतर थारचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर केले जाईल.

महिंद्रा कार निर्मात्या कंपनीकडून त्यांचा भारतीय ऑटो मार्केटमधील इलेक्ट्रिक कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी त्यांच्या XUV.e8 एसयूव्ही आणि XUV400 एसयूव्ही कार २०२४ मध्ये लाँच करणार आहे.

महिंद्रा थार इलेक्ट्रिक एसयूव्ही कारच्या केबिनमध्ये ग्रॅब हँडल्ससह फ्लॅट डॅश, कॅपेसिटिव्ह कंट्रोल्ससह थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, इन्स्ट्रुमेंट कन्सोलवर लाइव्ह स्टेटस पिक्टोग्राम, ड्राइव्ह मोड्स निवडण्यासाठी रोटरी डायल आणि मध्यभागी बसलेली टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते.

कारच्या डिझाईनमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. कारच्या बाहेरील भागात स्क्वेअर हेडलॅम्प, तीन एलईडी स्लॅट घटकांसह एक आयताकृती लोखंडी जाळीचा भाग, एक आकर्षक दिसणारा बंपर, स्पेअरव्हीलसह बॉक्सी टेलगेट, स्क्वेअर-आकाराचे एलईडी टेल लॅम्प कारमध्ये पाहायला मिळेल.

महिंद्रा थार इलेक्ट्रिक कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाईल. कारमध्ये 60 kWh बॅटरी पॅक वापरला जाण्याची शक्यता आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 325 किमी पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देईल असा दावा करण्यात येत आहे.

कारमध्ये शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर जोडली जाईल. कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. महिंद्रा थार इलेक्ट्रिक एसयूव्ही कारची अंदाजे एक्स शोरूम किंमत 18.5 लाख रुपये असू शकते.