Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra Thar Vs Maruti Jimny : थार आणि जिमनी या दोन्ही ऑफ रोडींग कारपैकी कोणती आहे बेस्ट? जाणून घ्या

महिंद्रा थार या कारला टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांची पहिली ऑफ रोडींग कार सादर केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या मनात कोणती कार बेस्ट आहे असा प्रश्न पडला आहे.

0

Mahindra Thar Vs Maruti Jimny :भारतीय ऑटो मार्केटमध्ये महिंद्रा कंपनीची थार ही ऑफ रोडींग कार म्हणून खूपच प्रसिद्ध झाली आहे. तसेच मारुती सुझुकी कंपनीकडून देखील थार कारला टक्कर देण्यासाठी त्यांची जिमनी कार लॉन्च करण्यात आली आहे.

भारतीय ऑटो बाजारात थारला पर्याय नव्हता म्हणून या कारची लोकप्रियता अधिक वाढत गेली. तसेच या कारचे बुकिंग देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र आता याच कारला टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकी कंपनीकडून जिमनी कार लॉन्च करण्यात आली आहे.

मारुती जिमनी या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 12.74 ते 15.05 लाख रुपये आहे. त्यामुळे आता ग्राहक थार या कारला पर्याय म्हणून मारुती जिमनी या कारकडे पाहत आहेत. मात्र दोन्हीपैकी कोणती कार ऑफ रोडींगसाठी बेस्ट आहे याबद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. चला तर कोणती कार सर्वोत्तम आहे हे जाणून घेऊया.

इंजिन आणि पॉवर

मारुती सुझुकीच्या जिमनी या कारमध्ये 1.5 लीटर इंजिन देण्यात येत आहे. तसेच हे इंजिन 103bhp पॉवर आणि 134Nm टॉर्क जनरेट करते. तसेच थार कारमध्ये ३ इंजिन पर्याय देण्यात येत आहेत. थार या कारमध्ये सर्वात लहान इंजिन 1.5L डिझेल इंजिन आहे जे 150bhp आणि 320Nm टॉर्क जनरेट करते.

तसेच याशिवाय थार कारमध्ये आणखी दोन पेट्रोल आणि डिझेल इंजिन देखील देण्यात येतात. त्यामुळे इंजिन आणि पॉवरच्या बाबतीत थार ही कार मारूती जिमनीच्या खूप पुढे आहे.

दोन्ही कार ऑफ रोडींगसाठी बनवण्यात आल्या असल्या तरीही महिंद्रा कंपनीची थार कार आगोदरच तिची क्षमता सिद्ध केलीआहे. महिंद्रा थार या कारपेक्षा मारुती सुझुकी कंपनीच्या जिमनी कारचे वजन तब्बल ६०० किलोंनी कमी आहे.

त्यामुळे जिमनी या कारला छोट्या रस्त्याने आणि शहरामध्ये चालण्यास कोणतीही अडचण येणार नाही असा दावा करण्यात येत आहे. मात्र थारचे वजन आणि मोठ्या आकारामुळे ती शहरातील रस्त्यांवर आरामदायी होऊ शकणार नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जिमनी कार सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे.

सुरक्षितता वैशिष्ट्ये

मारुती जिमनी कार कार तुम्ही रोजच्या दैनंदिन वापरासाठी वापरू शकता. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये ६ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. मारुती जिमनी कारला ग्लोबल NCAP ला 4 स्टार रेटिंग मिळाले आहे.

दोन्ही वाहनांच्या आकारमानात मोठा फरक आहे. समान लांबी असूनही, थार जिमनीपेक्षा खूपच रुंद आणि उंच आहे, ज्यामुळे थारला जिमनीपेक्षा एक सर्वोत्तम मानले जात आहे.

किंमत

मारुती सुझुकी जिमनी कारच्या सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख आहे. तर थार कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.54 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे तुम्ही बजेट आणि आवडीनुसार कार खरेदी करू शकता.

दोन्ही कारपैकी सर्वोत्तम कार कोणती?

मारुती जिमनी ही कार ५ दरवाजांसह ग्राहकाना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दैनंदिन वापरासाठी ही कार सर्वोत्तम मानली जात आहे. मात्र थार कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे थार SUV कार दमदार असल्याने ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.