Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra Upcoming 2024 SUVs : 2024 मध्ये महिंद्रा लॉन्च करणार या 5 SUVs ! मिळणार हे लक्झरी फीचर्स

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या इलेक्ट्रिक कारसह आणखी नवीन एसयूव्ही कार सादर केल्या जाणार आहेत. २०२४ मध्ये महिंद्रा त्यांच्या नवीन कार लाँच करण्यासाठी सज्ज झाल्याचे बोलले जात आहे.

0

Mahindra Upcoming 2024 SUVs : महिंद्रा कार उत्पादक कंपनी २०२४ मध्ये त्यांच्या आणखी ५ नवीन एसयूव्ही कार लाँच करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. महिंद्राकडून त्यांच्या या नवीन एसयूव्ही कारवर काम देखील सुरु केल्याचे दिसत आहे.

महिंद्राने २०२४ मध्ये त्यांच्या पाच डॅशिंग एसयूव्ही कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल एसयूव्हीसह इलेक्ट्रिक कारचा देखील समावेश आहे. ग्राहकांची आवडती थार देखील मोठ्या बदलांसह पुन्हा लाँच केली जाणार आहे.

1. महिंद्रा XUV700 6-सीटर

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांची XUV700 एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये ५ आणि ७ सीटर पर्यायामध्ये सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आता कंपनीने या कारचे ६ सीटर मॉडेल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२४ मध्ये XUV700 एसयूव्ही कारचे ७ सीटर मॉडेल बाजारात पाहायला मिळू शकते. या कारमध्ये ADAS सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. नवीन XUV700 एसयूव्ही कारमध्ये काही कॉस्मेटिक बदल पाहायला मिळतील.

कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. सध्या कारमध्ये 2.0-लिटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे जे 200 PS पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच कारमध्ये 2.2-लिटर mHawk टर्बो डिझेल इंजिन दिले आहे जे 185 PS पॉवर आणि 450 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

2. महिंद्रा थार 5-डोअर

महिंद्रा थार देशातील सर्वाधिक लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही कार आहे. सध्या या कारचे ३ डोअर व्हर्जन बाजारात उपलब्ध आहे. लवकरच या कारचे ५ डोअर व्हर्जन देखील बाजारात सादर केले जाणार आहे. कारमध्ये अनके कॉस्मेटिक बदल पाहायला मिळू शकतात.

कारमध्ये साइड स्टेप्स, पिलर-माउंटेड मागील दरवाजा हँडल, नवीन अलॉय व्हील्स आणि नवीन एलईडी टेललॅम्प्स पाहायला मिळू शकते. तसेच नवीन थारमध्ये एक मोठे टचस्क्रीन हेड युनिट, सनरूफ आणि मागील एसी व्हेंट्स दिले जातील.

3. महिंद्रा बोलेरो निओ प्लस

बोलेरो कारचे निओ प्लस मॉडेल २०२४ मध्ये भारतात पाहायला मिळू शकते. नवीन बोलेरो निओ प्लस एसयूव्ही 7-सीटर किंवा 9-सीटर पर्यायामध्ये सादर केली जाऊ शकते. कारमध्ये 2.2-लीटर mHawk टर्बो डिझेल इंजिन दिले जाईल जे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले असेल.

4. महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

महिंद्राकडुन त्यांच्या लोकप्रिय XUV300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये लाँच केले जाणारा आहे. ही कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे. कारमध्ये अनेक बदल केले जाणार असून डिझाईन देखील बदलले जाईल.

कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, वायरलेस फोन चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हवेशीर फ्रंट सीट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफसह ही कार सादर केली जाईल. तसेच नवीन XUV300 एसयूव्ही कारमध्ये ADAS सुरक्षा फीचर्स जोडले जाईल.

5. महिंद्रा XUV.e8

महिंद्राची सध्या बाजारात एकमेव इलेक्ट्रिक एसयूव्ही विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता महिंद्रा त्यांच्या आणखी नवीन XUV.e8 इलेक्ट्रिक एसयूव्ही कार सादर केली जाणार आहे.

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार INGLO स्केटबोर्ड आर्किटेक्चर विकसित केली जाईल. XUV.e8 इलेक्ट्रिक एसयूव्ही कारमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय दिला जाईल. कारमध्ये जबरदस्त रेंज देणारी बॅटरी पॅक पर्याय कारमध्ये दिला जाईल.