Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra Upcoming 4 SUVs : 2024 मध्ये येणार महिंद्राच्या या 4 डॅशिंग SUVs ! 5 डोअर थारचाही समावेश, पहा किंमत

0

Mahindra Upcoming 4 SUVs : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून 2024 मध्ये त्यांच्या अनेक नवीन एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे एसयूव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नवीन एसयूव्हीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून एसयूव्ही कारची वाढती मागणी लक्षात घेता 2024 मध्ये त्यांच्या 4 नवीन एसयूव्ही कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इलेक्ट्रिक कारचा देखील समावेश आहे.

1. अपडेटेड महिंद्रा XUV400

महिंद्रा त्यांच्या XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करणार आहे. या कारमध्ये अनके बदल केले जाण्याची शक्यता आहे. महिंद्राची XUV400 ही एकमेव इलेक्ट्रिक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

XUV400 फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एक सुधारित डॅशबोर्ड आणि सेंटर कन्सोल असे फीचर्स नव्याने जोडले जाऊ शकतात.

2. Mahindra XUV300 EV

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही XUV300 चे फेसलिफ्ट मॉडेल पुढील वर्षी भारतात सादर केले जाणार असून आता लवकरच महिंद्रा त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारचे EV मॉडेल भारतात लाँच करू शकते.

ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 350 किमी ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असेल. कारची एक्स शोरूम किंमत 14.5 लाख रुपये असू शकते.

3. 5-डोअर महिंद्रा थार

महिंद्राची लोकप्रिय ऑफ रोडर एसयूव्ही थारचे आता 5-डोअर व्हर्जन लवकरच भारतात लाँच होणार आहे. थार 5-डोअर एसयूव्ही कारवर कंपनीकडून वेगाने काम सुरु करण्यात आले आहे.

कारच्या व्हीलबेसमध्ये मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपये असू शकते. नवीन थारमध्ये 2.2L डिझेल आणि 2.0L पेट्रोल इंजिन पर्याय दिला जाऊ शकतो.

4. महिंद्रा XUV.e8

महिंद्रा त्यांच्या XUV700 एसयूव्ही कारवर आधारित त्यांची XUV.e8 इलेक्ट्रिक एसयूव्ही कार 2024 मध्ये भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करू शकते. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि मजबूत बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो.

XUV.e8 इलेक्ट्रिक एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत 28 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते. सिंगल आणि ड्युअल ई-मोटर सेटअपसह XUV.e8 इलेक्ट्रिक कार सादर केली जाऊ शकते.