Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra XUV300 EV : Nexon EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्रा सज्ज ! लॉन्च करणार ही नवीन EV कार, मिळणार मजबूत बॅटरी पॅक

0

Mahindra XUV300 EV : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. आता महिंद्रा देखील त्यांची आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे.

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये फक्त एक इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. आता इलेक्ट्रिक कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी आणखी नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत.

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल पुढील वर्षी लॉन्च केले जाणार आहे. XUV300 फेसलिफ्ट कारबरोबरच XUV300 EV कार देखील सादर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टाटा Nexon EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राने XUV400 EV कार लॉन्च केली होती. टाटा Nexon EV कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता Nexon EV चे EV सेगमेंटमधील वर्चस्व संपवण्यासाठी महिंद्रा XUV300 EV एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.

XUV300 EV ची संभाव्य वैशिष्ट्ये

महिंद्रा कार कंपनीकडून XUV300 एसयूव्हीचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाणार असून लवकरच XUV300 कारचे EV मॉडेल देखील लॉन्च केले जाणार आहे. पुनर्डिझाइन केलेल्या बंपर आणि हँडलॅम्प असेंबलीसह नवीन लुक ड्रॉप डाउन एलईडी डेटाइम रनिंग लॅम्पसह XUV300 EV कार लॉन्च केली जाणार आहे.

नवीन EV कारमध्ये पूर्ण-रुंदीच्या LED लाइट बारसह मागील बाजूस पुन्हा डिझाइन केलेले टेलगेट पाहायला मिळेल. ताईच कारमध्ये सी-आकाराचे टेललॅम्प देखील दिले जातील. तसेच XUV300 EV कारमध्ये अलॉय व्हील दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

XUV300 EV किंमत

महिंद्राकडून त्यांच्या आगामी XUV300 EV कारच्या किंमत किंवा फीचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. XUV300 EV एसयूव्ही कारमध्ये 35kWh बॅटरी पॅक दिला जाईल.

या इलेक्ट्रिक कारची एक्स शोरूम किंमत अंदाजे 15 ते 17 लाख रुपये असू शकते. कारची किंमत पुढील वर्षी जूनपर्यंत कंपनीकडून जाहीर करण्यात येईल. XUV400 EV कारपेक्षा XUV300 EV ची किंमत 2 लाख रुपये असू शकते.