Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra XUV300 Facelift : Brezza, Sonet, Venue ची बत्ती गुल ! या मोठ्या बदलांसह महिंद्रा लॉन्च करणार XUV300 चे फेसलिफ्ट मॉडेल

महिंद्रा कार निर्मात्या कंपनीकडून त्यांची XUV300 फेसलिफ्ट एसयूव्ही कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये अनेक नवीन बदल केले जाणार आहेत.

0

Mahindra XUV300 Facelift : देशातील ऑटो मार्केटमधील एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता आता महिंद्रा कार कंपनी देखील त्यांच्या नवीन एसयूव्ही कार लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये सादर केले जाणार आहे.

महिंद्राच्या कारला बाजारात चांगली आहे. तसेच XUV700, Scorpio, बोलेरो, थार या एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. महिंद्राकडे या कारच्या 2.86 लाखांहून अधिक ऑर्डर आल्या आहेत.

महिंद्रा कार कंपनीकडून २०२४ मध्ये त्यांच्या अनेक एसयूव्ही कार लाँच केल्या जाणार आहेत. यामध्ये XUV300 एसयूव्ही कारच्या फेसलिफ्ट मॉडेलचा देखील समावेश आहे. XUV300 फेसलिफ्ट कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत.

XUV300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल भारतीय ऑटो मार्केटमध्ये लाँच होताच Kia Sonet, Hyundai Venue, Maruti Brezza या एसयूव्ही कारशी स्पर्धा करेल. XUV300 फेसलिफ्ट एसयूव्हीमध्ये जबरदस्त फीचर्स जोडले जाणार आहेत.

XUV300 फेसलिफ्ट एसयूव्ही कार चाचणी दरम्यान दिसून आली आहे. कारमध्ये ADAS सुरक्षा फीचर्स दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ADAS सुरक्षा फीचर्स शिवाय ही कार चाचणी दरम्यान दिसून आली आहे.

कारमध्ये काय असणार नवीन?

XUV300 फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये C-आकाराचे LED DRLs, कनेक्ट केलेल्या LED स्ट्रिपसह नवीन टेल लाइट्स, नवीन अलॉय व्हील्स, एक मोठी टचस्क्रीन पाहायला मिळाली आहे. चाचणी ड्रमायन कारचे काही फीचर्स देखील लीक झाले आहेत. XUV300 फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे.

महिंद्रा का उत्पादक कंपनीकडून त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारला आधुनिक फीचर्सने सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला आहे. कारमध्ये सिंगल-पेन सनरूफ दिले जात आहे. आता कंपनीकडून त्यांच्या XUV300 फेसलिफ्टमध्ये पॅनोरामिक सनरूफ दिले जाण्याची शक्यता आहे.

सध्याच्या कारपेक्षा XUV300 फेसलिफ्टमध्ये अनेक नवीन फीचर्स असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या XUV300 एसयूव्ही कारपेक्षा नवीन कारची किंमत देखील जास्त असू शकते.