Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mahindra XUV400 Facelift : महिंद्रा XUV400 फेसलिफ्ट पुन्हा दिसली! होणार मोठे बदल, देणार इतकी रेंज

0

Mahindra XUV400 Facelift : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक शक्तिशाली कार सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता महिंद्राकडून त्यांच्या चालू वर्षात अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत.

Mahindra XUV400 Facelift
Mahindra XUV400 Facelift

महिंद्राची नवीन XUV400 फेसलिफ्ट एसयूव्ही कार चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. कारचे काही फीचर्स देखील यावेळी लीक झाले आहेत. कारमध्ये फारसे काही बदल करण्यात आले नाहीत.

महिंद्राची नवीन XUV400 फेसलिफ्ट एसयूव्ही कार Nexon EV फेसलिफ्टशी स्पर्धा करेल. महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारचा YouTube व्हिडिओ लीक झाला आहे. XUV400 EL Pro नवीन फेसलिफ्ट कारचे नाव असेल.

नवीन XUV400 फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, फ्लोटिंग 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन 10.25-इंच ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, TFT डिस्प्लेसह, आणि नवीन फ्लॅट-बॉटम स्टार्टिंग व्हील कॉपर फिनिश ट्विन पीक्स असे फीचर्स दिले जातील. तसेच कारमध्ये नवीन यूएसबी पोर्ट, वायरलेस चार्जर, फ्रंट सेंटर आर्मरेस्ट आणि यूएसबी-सी पोर्टसह मागील एचव्हीएसी व्हेंट्स देखील देण्यात आले आहेत.

Mahindra XUV400 Facelift
Mahindra XUV400 Facelift

महिंद्रा XUV400 EC Pro आणि EL Pro असे दोन व्हेरियंट XUV400 फेसलिफ्ट कारमध्ये सादर केले जातील. कारच्या EC Pro व्हेरियंटमध्ये 34.5 kWh बॅटरी पॅक देण्यात येईल जो सिंगल चार्जमध्ये 375 ड्रायव्हिंग रेंज देईल. तर कारच्या EL Pro व्हेरियंटमध्ये 39.4 kWh बॅटरी देण्यात येईल जो सिंगल चार्जमध्ये 456 किमी रेंज देण्यास सक्षम असेल.

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या XUV400 फेसलिफ्ट कारच्या चारही चाकांवर डिस्क ब्रेक दिला जाणार आहे. तसेच कारमध्ये फन, फास्ट आणि फियरलेस असे तीन ड्राईव्ह मोड दिले जाणार आहेत.

Mahindra XUV400 Facelift
Mahindra XUV400 Facelift

कारची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी 50 kW DC फास्ट चार्जर देण्यात आला आहे. 7.2 kW च्या चार्जरने 6 तास 30 मिनिटांत 0-100 टक्क्यांपर्यंत कारची बॅटरी चार्ज होते. तर 3.3 kW AC चार्जरने कारची बॅटरी चार्ज होण्यास 13 तास लागतात.