Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti 7 Seater Car : 8 लाख किंमत आणि 26 Kmpl मायलेज! मारुतीची ही 7-सीटर कार ठरली नंबर वन, पहा फीचर्स

तुम्हालाही नवीन ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात मारुतीची शानदार फॅमिली कार उपलब्ध आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Maruti 7 Seater Car : मारुती सुझुकीकडून नेहमीच कमी बजेटमध्ये दमदार मायलेज देणाऱ्या कार सादर केल्या जात आहेत. मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. तसेच देशातील कार विक्रीत देखील नंबर वन कंपनी आहे.

मारुती सुझुकीकडून सर्वच सेगमेंटमध्ये कार सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकीच्या ७ सीटर कार एर्टिगाची ग्राहकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा कार देशातील ७ सीटर कार विक्रीमध्ये नंबर वन कार ठरली आहे. ऑगस्टमध्ये २०२३ मध्ये या कारच्या 12,315 युनिट्सची विक्री झाली आहे. ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या आकाराच्या यादीत ८ व्या क्रमांकावर होती. Innova Crysta आणि Hyundai Alcazar कारला मागे टाकत एर्टिगा ही कार नंबर वन ठरली आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा कारने ऑगस्ट २०२३ मध्ये 12,315 युनिट्सची विक्री केली आहे तर गेलूया वर्षी या कारची ऑगस्ट २०२२ मध्ये 9,314 युनिट्सची विक्री केली होती. यावर्षी एर्टिगा कारची 3,001 अधिक युनिट्स जास्त विकली गेली आहेत. मारुती सुझुकी एर्टिगा कारची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे.

मारुती एर्टिगा इंजिन

मारुती सुझुकी एर्टिगा कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103PS पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. कारचे पेट्रोल मॉडेल 20.51 kmpl मायलेज देते तर सीएनजी मॉडेल २६.११ किमी/किलो मायलेज देते.

मारुती अर्टिगाची वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी एर्टिगा कारमध्ये 7-इंचाच्या टचस्क्रीन युनिटऐवजी 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येत आहे. स्मार्टप्ले प्रो तंत्रज्ञान आहे जे व्हॉईस कमांड आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानास जोडले आहे. कारमध्ये वाहन ट्रॅकिंग, टो अवे अलर्ट आणि ट्रॅकिंग, जिओ-फेन्सिंग, ओव्हर-स्पीडिंग अलर्ट आणि रिमोट फंक्शन, 360-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा आणि क्रूझ कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत.