Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti 800 History : मारुती 800 ने पूर्ण केली 40 वर्षे ! किंमत होती फक्त 47 हजार, पहा पहिली 800 कार कोणी केली होती खरेदी?

0

Maruti 800 History : भारतात काही वर्षांपूर्वी वाहन उद्योग खूपच मंदावला होता. 80 च्या दशकापर्यंत चारचाकी वाहनांना प्रसिद्धी मिळत नव्हती. या काळात कोणी नवीन कार खरेदी केली तर ही कार पाहण्यासाठी लांबून लोक येत असत.

भारतातही पहिली हॅचबॅक कार म्हणून मारुती 800 ला ओळखले जाते जी पंतप्रधान संजय गांधी यांनी लॉन्च केली होती. त्याकाळी ही कार सर्वात प्रथम आणि कोणी किती रुपयांना खरेदी केली हे जाणून घेऊया.

इतक्या रुपयात पहिली हॅचबॅक कार लॉन्च झाली होती

देशातील पहिली हॅचबॅक कार मारुती सुझुकीने अगदी कमी किमतीत लॉन्च केली होती. मारुती 800 हॅचबॅक कार 47,500 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आली होती. मारुती 800 हॅचबॅक कार सर्वसामान्यांसाठी उत्तम कार बनली होती. मात्र जसा काळ बदलला तशी कारची किंमत देखील वाढत गेली.

देशातील या व्यक्तीने खरेदी केली पहिली मारुती 800

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 डिसेंबर 1983 या दिवशी पहिल्या मारुती 800 हॅचबॅक कारच्या चाव्या नवी दिल्लीतील हरपाल सिंग यांच्या हवाली केल्या होत्या. इतिहासात असे पहिल्यांदाच घडले होते पंतप्रधान यांनी कारच्या चाव्या दिल्या होत्या.

मारुती सुझुकीची दुसरी 800 हॅचबॅक कार रांचीचे रहिवासी डॉ. रामदेव गुप्ता यांनी खरेदी केली होती. मात्र दुसऱ्या कारला तब्बल एक वर्षांनी ग्राहक मिळाले होते. या ठिकाणाहून मारुती सुझुकी 800 चा प्रवास सुरु झाला.

मारुतीची पहिली कार मारुतीच्या मुख्यालयात आहे

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या 800 कारचा इतिहास लक्षात ठेवण्यासाठी पहिली 800 हॅचबॅक कार दिल्लीतील मुख्यालयात ठेवली आहे. बऱ्याच दिवसांनंतर मारुती सुझुकीला त्यांची पहिली 800 कार सापडली होती.

मारुती सुझुकी इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी ट्विट करून सांगितले होते की, 40 वर्षांपूर्वीची मारुती 800 कार कंपनीचा इतिहास लक्षात ठेवण्यासाठी मारुतीच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आली आहे. तसेच या कारचा एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे.