Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Alto k10 : 4 लाखात 33 Kmpl मायलेज! खरेदी करा मारुतीची प्रीमियम फीचर्स बजेट कार, होईल फायदा…

स्वस्तात दमदार मायलेज देणारी कार हवी असेल तर मारुतीची शानदार फीचर्स कार उपलब्ध आहे. 4 लाखांच्या बजेटमध्ये 33 Kmpl मायलेज देणारी कार खरेदी करू शकता.

0

Maruti Alto k10 : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने अनेक नवीन कार ग्राहक सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी त्यांच्या सीएनजी कार सादर केल्या आहेत. सीएनजी कारच्या किमती जास्त आहेत. मात्र तुम्ही फक्त ४ लाखात 33 Kmpl मायलेज देणारी कार खरेदी करू शकता.

मारुती सुझुकीकडून ग्राहकांना नेहमी कमी बजेटमध्ये शानदार कार सादर केल्या जात आहेत. त्यामुळे मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कार उत्पादक कंपनी आहे. मारुतीच्या कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देखील दिले जातात. मारुती सुझुकीची Alto k10 कमी बजेटमधील सर्वाधिक मायलेज देणारी कार उत्तम पर्याय आहे.

स्मार्ट कारमध्ये चार व्हेरियंट उपलब्ध

मारुती सुझुकी अल्टो K10 कारमध्ये Std (O), LXi, VXi आणि VXi+ अशी ४ व्हेरियंट दिले जातात. तसेच या कारमध्ये 998 cc पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे.

Maruti Alto k10

मारुती सुझुकी अल्टो K10 कारमधील इंजिन 55.92 ते 65.71 Bhp पॉवर जनरेट करते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायसह बाजारात उपलब्ध आहे. कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात येत असल्याने कार चालवणे आरामदायी ठरू शकते.

आकर्षक 6 मोनोटोन रंग

मारुती सुझुकी अल्टो K10 कार मेटॅलिक सिझलिंग रेड, मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक ग्रॅनाइट ग्रे, मेटॅलिक स्पीडी ब्लू, प्रीमियम अर्थ गोल्ड आणि सॉलिड व्हाइट अशा सहा मोनोटोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही कार पेट्रोल व्हर्जनमध्ये 24.9 kmpl पर्यंत मायलेज देते तर सीएनजी व्हर्जनमध्ये 33.85 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी अल्टो K10 कारमध्ये 214 लीटरची बूट स्पेस देण्यात येत आहे. कारचे VXi मॉडेल सीएनजीमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कारमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, ORVM, ड्युअल एअरबॅग्ज, ABS, रिअर पार्किंग सेन्सर अशी प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.