Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Alto k10 CNG : 4 लाखांत घरी आणा 30 Kmpl मायलेज देणारी CNG कार, मिळतात उत्तम फीचर्स

तुम्हालाही परवडणारी CNG कार खरेदी करायची असेल तर मारुती सुझुकीची उत्तम सीएनजी कार अगदी कमी बजेटमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

0

Maruti Alto k10 CNG : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दारात देखील प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकजण सीएनजी कारचा पर्याय निवडताना दिसत आहे.

तुम्हालाही या दिवाळीत सीएनजी कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम सीएनजी कार अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे. ही कार तुम्ही अगदी ४ लाख रुपयांमध्ये घरी आणू शकता.

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून नेहमीच कमी बजेट कार सादर केल्या जात आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुतीच्या कार मध्यमवर्गीयांसाठी उत्तम पर्याय आहेत.

सीएनजी कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हालाही स्वस्त सीएनजी कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी मारुतीची Alto k10 CNG कार उत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीने सादर केलेल्या अल्टो कारच्या पहिल्या मॉडेलपासून आजपर्यंत एकूण 45 लाख युनिट्सची विक्री केली आहे. Alto k10 CNG कार ३० Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. Alto k10 कार पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये सादर करण्यात आली आहे.

मारुती Alto k10 वैशिष्ट्ये

मारुती सुझुकीकडून Alto k10 कारमध्ये उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन Alto k10 कारमध्ये रीअर बंपर, स्वीप्टबॅक हॅलोजन हेडलॅम्प, सिंगल-पीस ग्रिल, सिल्व्हर व्हील कव्हर्स, टेल लाइट्स, इंटिग्रेटेड स्पॉयलर, हाय-माउंट स्टॉप लॅम्प आणि फेंडर-माउंट टर्न इंडिकेटर देण्यात आले आहे.

तसेच कारमध्ये सिल्व्हर अॅक्सेंट, सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, एसी व्हेंट्स, पॉवर विंडो, सेंटर कन्सोल, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्ससह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह ब्लॅक इंटीरियर थीम असे फीचर्स दिले गेले आहेत.

सुरक्षेसाठी Alto k10 कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम आणि सीट-बेल्ट रिमाइंडर सिस्टम अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

मारुती Alto k10 किंमत

मारुती सुझुकीच्या Alto k10 कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे. त्यामुळे अगदी कमी बजेटमध्ये शानदार कारचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे.