Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

33 किमी मायलेज आणि अप्रतिम फीचर्ससह अवघ्या 66 हजारात घरी आणा मारुतीची ‘ही’ सर्वात भारी कार। Maruti Alto K10 CNG Finance Plan

भारतीय बाजारात लोकप्रिय ठरलेली मारुती सुझुकीची दमदार कार Maruti Alto K10 CNG अवघ्या 66 हजारात घरी आणू शकतात.

0

 Maruti Alto K10 CNG Finance Plan :   जर तुम्ही नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही आज तुम्हाला एका मस्त आणि सर्वात भारी फायनान्स प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत भारतीय बाजारात लोकप्रिय ठरलेली मारुती सुझुकीची दमदार कार Maruti Alto K10 CNG अवघ्या 66 हजारात घरी आणू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या भारतीय ऑटो बाजारात Maruti Alto K10 CNG ची खूपच मागणी पाहायला मिळत आहे. उत्तम मायलेज तसेच बेस्ट फीचर्स आणि जबरदस्त लूकमुळे सध्या ही कार भारतीय ऑटो बाजारात धुमाकूळ घालत आहे. चला मग जाणून घेऊया अवघ्या 66 हजारात तुम्ही कार घरी कशी आणू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आज भारतीय ऑटो बाजारात  Maruti Alto K10 CNG बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत  5,96,000 पासून सुरु होते आणि ऑन-रोडसाठी तुम्हाला तब्बल  6,48,626 रुपये मोजावे लागतात मात्र इथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही ही कार फक्त 66 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटवर मिळवू शकता.

Maruti Alto K10 CNG फायनान्स प्लॅन

ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, जर तुमचे बजेट 66000 रुपये असेल आणि तुम्ही भविष्यात या कारचा मासिक ईएमआय भरू शकत असाल, तर या आधारावर बँक दरवर्षी 9.8 टक्के व्याजदराने 5,82,626 रुपयांचे कर्ज देऊ शकते.

मारुती अल्टो K10 CNG वर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला 66 हजार रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण होताच तुमचे कर्ज सुरू होईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी (बँकेने निश्चित केलेला कर्ज परतफेडीचा कालावधी) दरमहा रु. 12,322 चा मासिक EMI जमा करावा लागेल.

Maruti Alto K10 CNG  इंजिन आणि ट्रान्समिशन

Maruti Alto K10 मध्ये, कंपनीने 998 cc इंजिन बसवले आहे जे 55.92 bhp पॉवर आणि 82.1 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Maruti Alto K10 CNG  मायलेज

मायलेजबद्दल, मारुती सुझुकीचा दावा आहे की अल्टो K10 एक किलो CNG वर 33.85 किमी मायलेज देते. हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.

Maruti Alto K10 CNG फीचर्स

Alto K10 मध्ये मारुती सुझुकीने मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, पॉवर विंडो, पॉवर स्टीयरिंग आणि एअर कंडिशनर यांसारखी फीचर्स दिली आहेत.