Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Baleno Car : 30 kmpl मायलेज आणि 318 लिटरची मोठी बूट स्पेस! मारुतीची ही लोकप्रिय फॅमिली कार खरेदी करा अवघ्या 11000 रुपयांत

तुम्हीही सर्वाधिक मायलेज देणारी आणि कमी किमतीची कार शोधत असाल तर तुमच्यासाठी मारुतीची एक सर्वोत्तम कार आहे. जी कार 30 kmpl मायलेज देते.

0

Maruti Baleno Car : मारुती सुझुकी कंपनीच्या कार भारतामध्ये सर्वाधिक विक्री होत आहेत. तसेच या कंपनीच्या नावावर सर्वाधिक कार विक्री करण्याची देखील नोंद आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक मायलेज आणि कमी किमती म्हणून ओळखल्या जातात.

मारुती सुझुकी कंपनीच्या कारची किंमत कमी असते. तसेच या कार सर्वाधिक मायलेज देत असल्याने ग्राहक या कंपनीच्या कारकडे आकर्षित होत असतात. तुम्हीही मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक मायलेज देणारी कार शोधत असाल तर तुमच्यासाठी बलेनो ही कार सर्वोत्तम पर्याय आहे.

बलेनो कार तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम कार आहे. या कारमध्ये 318 लिटरची मोठी बूट स्पेस देण्यात येत आहे. तसेच मारुतीची ही कार पेट्रोल आणि CNG दोन्ही व्हर्जनमध्ये येते. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कार खरेदी करू शकता.

55 लिटरची इंधन टाकी उपलब्ध आहे

मारुती सुझुकीच्या बलेनो कारमध्ये CNG आवृत्तीमध्ये 55 लिटरची इंधन टाकी देण्यात येत आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये ही कार 22.35 ते 22.94 kmpl मायलेज देते. तर सीएनजी मॉडेलमध्ये 30.61km/kg मायलेज देते.

कारमध्ये 1197 cc चे पॉवरफुल इंजिन

मारुती सुझुकी कंपनीच्या बलेनो कारमध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा मॉडेल देण्यात येत आहेत. या कारमध्ये 1197 cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात येत हे. हे इंजिन ७६.४३ ते ८८.५ बीएचपी पॉवर जनरेट करते.

कारमध्ये 6 एअरबॅगचा पर्याय आहे

मारुती सुझुकी बलेनोमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 6 एअरबॅगचा पर्याय देण्यात आला आहे. बलेनो कार Hyundai i20, Tata Altroz, Citroen C3 आणि Toyota Glanza कारला टक्कर देते.

9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

या कारमध्ये हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि कीलेस एंट्री सारखी वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत. तसेच कारमध्ये वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येत आहेत.

मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपयांपासून सुरु टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.88 लाख रुपये आहे. तुम्हाला बलेनो कार कमी किमतीमध्ये खरेदी करायची असेल तर तुम्ही ती EMI वर खरेदी करू शकता.

जर तुम्हाला ही कार EMI वर खरेदी करायची असेल तर 2,24,000 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट भरावे लागेल. तसेच तुम्हाला घेतलेल्या कर्जावर 9.8 टक्के व्याजदराने पाच वर्षांसाठी दरमहा 11,752 रुपये हप्ता भरावा लागेल. त्यामुळे तुम्ही देखील सर्वाधिक मायलेज देणारी मारुतीची ही कार खरेदी करू शकता.