Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Baleno : शून्य रुपयांत कार खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण! घरी आणा 34 Kmpl मायलेज देणारी स्टायलिश हॅचबॅक कार, मिळतात जबरदस्त फीचर्स

तुमचेही कमी बजेटमध्ये कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर ते अगदी शून्य रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकते. मारुतीची स्टायलिश हॅचबॅक कार 34 Kmpl मायलेज देते.

0

Maruti Baleno : कार खरेदी करण्याचे अनेकनाचे स्वप्न असते. मात्र नवीन कारच्या किमती अधिक असल्याने अनेकांना त्या खरेदी करणे परवडत नाही. तसेच ग्राहकांचे बजेट देखील कमी असते. मात्र आता तुमचेही कार खरेदी करण्याचे स्वप्न अवघ्या शून्य रुपयांमध्ये पूर्ण होईल.

तुमहालाही नवीन कार खरेदी करायची आहे आणि बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही मारुतीची सत्यलिश कार बलेनो अगदी शून्य रुपयांच्या डाउनपेमेंटवर घरी घेऊन जाऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे भरावे लागणार नाहीत.

मारुती सुझुकीची बलेनो कार ही सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ग्राहकांचा देखील या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात येत आहेत. तसेच मायलेजच्या बाबतीत देखील कार सर्वांच्या पुढे आहे.

उत्तम इंजिन

मारुती सुझुकी बलेनो कारमध्ये 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. तसेच या कारमध्ये सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे. पेट्रोलवर ही कार 22 किमी प्रति लिटर आणि सीएनजीवर 34 किमी प्रति किलो मायलेज देण्यास सक्षम आहे.

वैशिष्ट्ये देखील उत्तम

मारुती सुझुकी बलेनो कारमध्ये उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये 2 एअरबॅग्ज, ABS, EBD, चाइल्ड लॉक, आयसोफिक्स सीट्स, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, रियर पार्किंग सेन्सर्स, मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम, रिअर एसी व्हेंट्स, क्लायमेट कंट्रोल एसी आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुती सुझुकी बलेनो किंमत

मारुती सुझुकी बलेनो हॅचबॅक कार 9 व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे. तसेच टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 9.88 लाख रुपये आहे. तसेच बलेनो सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे.

शून्य डाऊन पेमेंटवर घरी आणा कार

कमी बजेट असेल तर तुम्ही शून्य डाउनपेमेंटवर ही कार घरी आणू शकता. राष्ट्रीयीकृत बँका आणि NBFC कडून कारवर कर्ज दिले जात आहे. जर तुम्हाला बलेनो सिग्मा कारचे मॉडेल विकत घ्यायचे असेल तर त्याची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे.

या कारवर कंपनीकडून 65 हजार रुपयांची सूटही देखील दिली जात आहे. त्यामुळे तुम्हाला ही कार खरेदी करण्यासाठी 5.96 लाख रुपये खर्च येईल. हे पैसे तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात दिले जातील.

7 वर्षांसाठी या कर्जावर 9 टक्के दराने वार्षिक व्याज आकारले जाईल. कारवर घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मासिक 9,589 रुपये भरावे लागतील. ७ वर्षात या कारसाठी तुमच्याकडून 2,09,484 रुपये व्याज आकारले जाईल.