Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Brezza : फक्त 2 लाखात घरी आणा मारुतीची डॅशिंग नवी कोरी ब्रेझा, कारच्या 25.51 Kmpl मायलेजपुढे ह्युंदाई, टाटा फेल…

कमी बजेटमध्ये मारुती सुझुकीची ब्रेझा एसयूव्ही कार खरेदीचे स्वप्न आता पूर्ण होईल. फक्त २ लाख रुपये भरून ही कार घरी आणू शकता.

0

Maruti Brezza : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून १० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये अनेक कार ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकीची ब्रेझा एसयूव्ही कार सर्वाधिक विक्रीमध्ये अव्वल स्थानी असल्याचे दिसत आहे.

सध्या टाटा मोटर्स आणि ह्युंदाई सारख्या कार उत्पादक कंपनीच्या कारला ब्रेझा कार टक्कर देत आहे. या कारसमोर ह्युंदाई आणि टाटा मोटर्सच्या एसयूव्ही कार देखील फेल ठरल्या आहेत. सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु सल्याचे दिसत आहे.

भारतात लवकरच सणासुदीचा हंगाम सुरु होणार आहे. या काळात अनेकजण नवीन कार खरेदी करण्याचा प्लांट करत असतात. मात्र काही वेळा कार खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर बजेट कमी पडते त्यामुळे अनेकांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न अपूर्णच राहते.

मात्र आता तुम्ही मारुती सुझुकी ब्रेझा कार 2 लाख रुपयांचे डाऊनपेमेंट भरून घरी आणू शकता. त्यामुळे आता कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे लागणार नाहीत. २ लाखात कार खरेदी केल्यानंतर दरमहा त्याचे पैसे भरावे लागतील.

मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही Lxi, Vxi, ZXi आणि ZXi+ या चार मॉडेल आणि 15 व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.14 लाखांपर्यंत जाते.

मारुती सुझुकी कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे तसेच कारमध्ये CNG पर्याय देखील उपलब्ध आहे. 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ब्रेझा कार उपलब्ध आहे.

ब्रेझा कारचे MT व्हेरियंट 17.38 kmpl पर्यंत, AT व्हेरियंट 19.8kmpl पर्यंत आणि CNG MT व्हेरियंट 25.51 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. जबरदस्त मायलेज असल्याने ही कार तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा LXI च्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे. कारची ऑन रोड किंमत 9,32,528 रुपये आहे. २ लाख रुपयांचे डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला या कारवर 7,32,528 रुपयांचे कर्ज घ्यावे घ्यावे लागेल.

कारवर घेतलेल्या कर्जाचा कालावधी 5 वर्षांचा असेल आणि या कर्जावर तुमच्याकडून 9 टक्के वार्षिक व्याज आकारले जाईल. ५ वर्षांसाठी तुम्हाला दरमहा 15,206 रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागेल. या कारच्या कर्जावर तुम्हाला 1.8 लाख रुपयांचे व्याज भरावे लागेल.