Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Brezza : 14 लाखांची मारुती ब्रेझा अवघ्या 97 हजारांत आणा घरी, देते 25 Kmpl मायलेज

मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कार अगदी ९७ हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी इंजिन देण्यात आले आहे.

0

Maruti Brezza : देशात कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच कारच्या किमती देखील वाढल्याने ग्राहकांना कार खरेदी करणे न परवडण्यासारखे झाले आहे. कमी बजेट ग्राहकांना एसयूव्ही कार खरेदी करण्याचे स्वप्न देखील पूर्ण करता येत नाही.

मात्र आता कमी बजेट ग्राहक अवघ्या ९७ हजार रुपयांमध्ये एसयूव्ही कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकतात. मारुती सुझुकीची लोकप्रिय एसयूव्ही कार ब्रेझा अवघ्या ९७ हजारांत घरी घेऊन जाण्याची चांगली संधी आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे लाखो रुपये नसतील तरीही काळजी करण्याची गरज नाही. ब्रेझा एसयूव्ही कारवर फायनान्स ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे कमी बजेट ग्राहक सहज एसयूव्ही कार खरेदी करू शकतात.

मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे ९७ हजार रुपये असणे आवश्यक आहे. ९७ हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरून तुम्ही ब्रेझा एसयूव्ही कार घरी आणू शकता.

मारुती सुझुकी ब्रेझा SUV किंमत

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची ब्रेझा एसयूव्ही कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.04 लाख रुपये आहे.

९७ हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला वार्षिक 9.8 टक्के व्याजदराने पाच वर्षांसाठी बाकीच्या पैशांचे कर्ज दिले जाईल. कर्जाची परतफेड करण्यासाठी दरमहा तुम्हाला 18,381 हजार रुपये EMI भरावा लागेल. कर्जाची परतफेड करण्यासाठी ५ वर्षांची मुदत दिली जाईल.

ब्रेझा CNG मायलेज

ब्रेझा एसयूव्ही कार सीएनजीमध्ये 25.51 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. ब्रेझा एसयूव्ही कार Kia Sonet, Renault Kiger आणि Mahindra XUV300 शी स्पर्धा करते.

ब्रेझा वैशिष्ट्ये

ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये 328 लीटरची मोठी बूट स्पेस देण्यात आलिया आहे. तसेच 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.