Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Brezza Vs Honda Elevate कोणती SUV आहे बेस्ट पर्याय? पहा किंमत, इंजिन आणि फीचर्स

मारुती सुझुकी Brezza आणि होंडा Elevate एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी कोणती एसयूव्ही बेस्ट आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

0

Maruti Brezza Vs Honda Elevate : देशात एसयूव्ही कारचा ट्रेंड सुरु आहे. तसेच लवकरच दिवाळी देखील सुरु होणार आहे. अशातच अनेकजण नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असतात. तुम्हीही होंडा Elevate किंवा मारुती Brezza एसयूव्ही कार खरेदीचा विचार करत असाल तर त्याआधी कारची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

मारुती सुझुकीची Brezza एसयूव्ही कार जुनी असून या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्याची Elevate एसयूव्ही कार अलीकडेच भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केली आहे.

Brezza Vs Elevate किंमत

होंडा कार कंपनीची Elevate एसयूव्ही कार SV, V, VX आणि ZX अशा चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.99 लाख रुपये ते टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकीची लोकप्रिय ब्रेझा कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मारुती ब्रेझा एसयूव्ही LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा चार व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.98 लाख रुपये आहे.

Brezza Vs Elevate इंजिन

Honda Elevate एसयूव्ही कारमध्ये 1.5-litre i-VTEC 4-सिलेंडर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 121PS पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये 1.5-लिटर K15C नैसर्गिकरित्या-एस्पिरेटेड केलेले पेट्रोल इंजिन दिले आहे जे 103PS पॉवर आणि 136.8Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार सीएनजी पर्यायमध्ये देखील ऑफर करण्यात आली आहे. कारमध्ये यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे.

Brezza Vs Elevate मायलेज

मारुती सुझुकीची ब्रेझा एसयूव्ही कारचे पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट 17.38 kmpl, ऑटोमॅटिक व्हेरियंट 19.8 kmpl आणि CNG व्हेरियंट 25.51 km/kg मायलेज देते. Elevate एसयूव्ही कारचे मॅन्युअल व्हेरियंट 15.31 किमी प्रति लिटर मायलेज देते तर CVT व्हेरियंट 16.92 किमी प्रति लिटर मायलेज देते.