Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

भन्नाट ऑफर! आता 70 हजारांच्या बचतीसह घरी आणा मारुतीच्या ‘ह्या’ सुपरहिट कार्स; पहा फोटो । Maruti Car Discount Offers

जुलै 2023 मध्ये Nexa डीलरशिपवर उपलब्ध असणाऱ्या अनेक कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी आता इग्निस, बलेनो आणि सियाझसारख्या कार्स खरेदी करू शकतात.

0

Maruti Car Discount Offers : देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी असणारी मारुती सुझुकी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जुलै 2023 मध्ये एक बंपर ऑफर देत आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक मस्त आणि बेस्ट कार तब्बल 70 हजारांची बचत करून घरी आणू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि कंपनी जुलै 2023 मध्ये Nexa डीलरशिपवर उपलब्ध असणाऱ्या अनेक कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी आता इग्निस, बलेनो आणि सियाझसारख्या कार्स खरेदी करू शकतात.

हे जाणून घ्या कि या ऑफरचा लाभ रोख सवलत, एक्सचेंज बोनस, स्क्रॅप बोनस आणि कॉर्पोरेट अंतर्गत उपलब्ध असेल. चला मग जाणून घेऊया मारुती सुझुकी कोणत्या कार्सवर जुलै 2023 किती डिस्काउंट देत आहे.

Maruti Ignis

मारुती या महिन्यात इग्निसवर एकूण 69,000 रुपयांची सूट देत आहे. ग्राहकांना 35,000 रुपयांची रोख सवलत, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 5,000 रुपयांचा स्क्रॅप बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर दिली जात आहे.

Maruti Baleno

मारुती बलेनोच्या झेटा आणि अल्फा पेट्रोल व्हेरियंटवर 10,000 रुपयांची रोख सूट, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा स्क्रॅप बोनस मिळत आहे. त्याच वेळी बलेनोच्या सिग्मा आणि डेल्टा पेट्रोल व्हेरियंटवर 20,000 रुपयांची रोख सूट, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा स्क्रॅप बोनस मिळत आहे. त्याच वेळी बलेनोच्या CNG व्हेरियंटवर 10,000 रुपयांची रोख सूट, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा स्क्रॅप बोनस मिळत आहे.

ही कार बाजारात सध्या धुमाकूळ घालत आहे. या कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स तसेच बेस्ट मायलेज आणि जबरदस्त लूक देखील पाहायला मिळत असल्याने ही कार बाजारात ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहे.

Maruti Ciaz

मारुतीच्या सर्वात लक्झरी सेडान सियाझवर या महिन्यात 33 हजार रुपयांची सूट मिळत आहे. कंपनीला 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 5,000 रुपयांचा स्क्रॅप बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. या ऑफरचा लाभ ग्राहकांना 31 जुलैपर्यंतच मिळणार आहे.