Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Car Offer : शून्य रुपयांत घरी आणा स्वप्नातील कार! मारुतीच्या 36 Kmpl मायलेज देणाऱ्या कारवर मिळतोय हजारोंचा बंपर डिस्काउंट, आजच घ्या लाभ

नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न अगदी कमी बजेटमध्ये पूर्ण करायचे असेल तर तुम्ही आता अगदी शून्य रुपयांत मारुतीची शानदार कर घरी घेऊन जाऊ शकता.

0

Maruti Car Offer : नवीन कार खरेदी करत असताना अनेकांची ती पहिलीच कार असते. त्यामुळे बहुतेकजण स्वस्त आणि दमदार मायलेज देणारी कार शोधत असतात. तसेच नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण कमी बजेटमध्ये ती खरेदी करण्याचा प्रयत्न करतात.

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सीएनजी कार खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. तसेच या सर्वांना पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक कारची मागणी देखील झपाट्याने वाढत आहे. आता अनेक कंपन्यांकडून त्यांच्या कारवर बंपर सूट देखील दिली जात आहे.

मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. तसेच दरवर्षी मारुती सुझुकीच्या लाखो कार विकल्या जात आहेत. देशातील सर्वत मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून मारुतीला ओळखले जाते.

जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही मारुतीची शानदार कार कोणत्याही डाउनपेमेंट शिवाय खरेदी करू शकता. मारुती सुझुकी एस प्रेसो ही स्वस्त आणि दमदार मायलेज देणारी कार तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते.

मारुतीकडून त्यांच्या एस प्रेसो कारवर मोठी ऑफर देण्यात येत आहे. तसेच कार मायलेजच्या बाबतीत देखील दमदार असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही ही कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

एस प्रेसो कारवर बंपर डिस्काउंट

मारुतीकडून त्यांची एस प्रेसो कार 4 व्हेरियंट केली जात आहे. कंपनीकडून ही कार सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये या कारवर कंपनीकडून मोठी सूट दिली जात आहे.

मारुती एस प्रेसो कारवर 35 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20 हजार रुपयांची रोख सवलत आणि 5 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. म्हणजेच या महिन्यात या कारवर 59 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. ही ऑफर फक्त ३० सप्टेंबर पर्यंतच आहे.

अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध

मारुतीकडून त्यांच्या एस प्रेसो कारमध्ये दोन एअरबॅग्स तसेच हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, EBD सह ABS, प्री-टेन्शनरसह फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर आणि फोर्स लिमिटर फ्रंट सीटबेल्ट, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ESP अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच यासोबतच इन्फोटेनमेंट सिस्टम, क्लायमेट कंट्रोल एसी आणि चाइल्ड लॉक असे फीचर्स देखील दिली आहेत.

एस प्रेसो मायलेज

मारुतीकडून त्यांच्या या कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन पेट्रोल मोडवर 65.7 bhp आणि CNG वर 55.9 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. एस प्रेसो कार पेट्रोलवर २५ Kmpl तर सीएनजीवर ३६ किमी प्रति किलो मायलेज देते.

कमी किमती आणि उत्तम वित्त ऑफर

तुमचेही बजेट कमी असेल तर या कारवर उत्तम ऑफर देण्यात येत आहे. तुम्ही एक रुपयाही न भारत ही कार घरी घेऊन जाऊ शकता. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.12 लाख रुपये आहे.

जर तुम्ही या कारचे बेस मॉडेल खरेदी केले तर तुम्हाला ही कार 4.73 लाख रुपयांना बसेल. या कारवर कंपनीकडून 59 हजार रुपयांची सूट या महिन्यात देण्यात येत आहे. जर तुम्ही कारवर कर्ज घेतले तर या कर्जावर तुमच्याकडून 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने पैसे आकारले जातील.

कारवर तुम्ही संपूर्ण कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा 6,674 रुपये भरावे लागतील. ७ वर्षात या पैशावर तुमच्याकडून 1,45,790 रुपये व्याज म्हणून घेतले जातील. मात्र कर्ज देताना सर्व बँका आणि फायनान्स कंपनीकडून तुमचा क्रेडिट स्कोअर तपासाला जाईल.