Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Cars Discount : Fronx, Grand Vitara आणि Jimny कारवर मिळतेय 2.3 लाख रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, पहा सविस्तर

0

Maruti Cars Discount : देशातील कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कारवर इयर एंड डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे डिसेंबर 2023 मध्ये कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. मारुती सुझुकी देखील त्यांच्या अनेक कारवर इयर एंड डिस्काउंट ऑफर देत आहे.

तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण या महिन्यात मारुती सुझुकी त्यांच्या कारवर लाखो रुपयांची सूट देत आहे. याचा फायदा घेऊन कार खरेदीवर तुम्ही पैशांची मोठी बचत करू शकता.

मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असली तरी त्यांच्या ग्राहकांना कारवर आकर्षक ऑफर देत आहे. या महिन्यात कार खरेदी करून 2.3 लाख रुपयांपर्यंत बचतीची चांगली संधी आहे.

मारुती सुझुकी त्यांच्या Jimny, Fronx आणि Grand Vitara सारख्या कारवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतीच्या स्वरूपात अनेक प्रकराची ऑफर देत आहे.

मारुती सुझुकी जिमनी

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या जिमनी ऑफ रोडींग एसयूव्ही कारवर ग्राहकांना 2 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे. जिमनी एसयूव्ही कारच्या Alpha आणि Zeta व्हेरियंटवर ही सूट दिली जात आहे.

कंपनीकडून नुकतेच जिमनी थंडर एडिशन सादर केले आहे. त्यामुळे कारची एक्स शोरूम किंमत 10.74 लाख रुपये झाली आहे. त्यामुळे कार खरेदीवर तुम्ही 2.3 लाख रुपयांची बचत करू शकता.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स

मारुती सुझुकीच्या Fronx एसयूव्ही कारवर ग्राहकांना 40 हजार रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंट देण्यात आले आहेत. कारच्या सीएनजी व्हेरियंटला प्रचंड मागणी आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा

मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्ही कारवर ग्राहकांना डिसेंबर 2023 मध्ये बंपर ऑफर देण्यात येत आहे. कारवर ग्राहकांना 35 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. कारच्या व्हेरियंटनुसार ग्राहकांना ऑफर देण्यात येत आहे. २०२४ पासून मारुती सुझुकी त्यांच्या कारची किंमत वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे.