Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Cars Discount : बंपर ऑफर! मारुती बलेनोपासून सियाझपर्यंतच्या कारवर मिळतेय हजारोंची मोठी सूट, असा घ्या ऑफरचा लाभ

मारुती सुझुकीकडून नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या कारवर हजारो रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे या महिन्यात कार खरेदी करून हजारोंची बचत करू शकता.

0

Maruti Cars Discount : मारुती सुझुकीची कार खरेदीचा विचार असेल तर तुमच्यासाठी हा सप्टेंबर २०२३ महिना सर्वोत्तम ठरू शकतो. या महिन्यात कार खरेदी करून तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. मारुतीकडून त्यांच्या कारवर हजारो रुपयांची मोठी सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकीकडून त्यांच्या अनेक कारवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत मारुतीची कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता. मारुतीकडून त्यांच्या निवडक कारवर बंपर सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकी इग्निस

मारुती सुझुकीकडून त्यांच्या मॅन्युअल गिअर बॉक्ससह येणाऱ्या इग्निस कारवर सूट दिली जात आहे. या कारवर कंपनीकडून 65,000 रुपयांपर्यंत मोथजी सूट दिली जात आहे. तसेच इग्निस कारच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मॉडेलवर 55,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.16 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

मारुती सुझुकी बलेनो

मारुती सुझुकी बलेनो या लोकप्रिय कारवर देखील या महिन्यात मोठी सूट देण्यात येत आहे. बलेनो कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक विक्रीमध्ये देखील या कारने बाजी मारली आहे. सप्टेंबर २०२३ या महिन्यात बलेनो पेट्रोल, मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि CNG व्हेरियंटवर एक्सचेंज ऑफरसह 35,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

2 ते 19 सप्टेंबर दरम्यान बुक केल्यास तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत फेस्टिव्हल डिस्काउंट देखील दिला जाईल. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

मारुती सुझुकी सियाझ

 

मारुती सुझुकी सियाझ सेडान कारवर देखील कंपनीकडून मोठी सूट देण्यात येत आहे. सियाझ कारच्या सर्व मॉडेलवर 48 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. मारुती सियाझ कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.