Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Cars Discount : मारुतीच्या या कार खरेदीचा प्लॅन आहे? तर याच महिन्यात करा खरेदी, होईल 58 हजारांची बचत, पहा ऑफर

मारुती सुझुकीकडून त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कारवर हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. या महिन्यात कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

0

Maruti Cars Discount : मारुती सुझुकी नेहमी ग्राहकांचसाठी कारवर बंपर सूट देत असते. त्यामुळे ग्राहक देखील मारुतीच्या कारकडे आकर्षित होत असतात. आता मारुतीकडून त्यांच्या अनेक कारवर सप्टेंबर २०२३ मध्ये हजारोंची सूट दिली जात आहे.

तुम्हीही मारुती सुझुकीची कार खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण या महिन्यात मारुतीच्या कार खरेदी करून तुम्ही देखील हजारो रुपयांची बचत करू शकता. Alto K10, Alto 800, Celerio, S-Presso, Wagon R, Dzire, Swift या कारवर ऑफर दिली जात आहे.

मारुती एस-प्रेसो

मारुती सुसुकीकडून त्यांच्या एस-प्रेसो कारवर 62,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कारच्या मॅन्युअल गिअरबॉक्स मॉडेल्सवर ही ऑफर उपलब्ध आहे. तर AMT मॉडेलवर 37,000 रुपयांची सूट दिली जात आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.12 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुतीच्या Celerio कारवर देखील सप्टेंबर २०२३ मध्ये मॅन्युअल पेट्रोल आणि CNG मॉडेलवर 62,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच कारच्या AMT म्हणजेच ऑटोमॅटिक मॉडेलवर 47,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरु होते. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.14 लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती सुझुकी अल्टो K10

मारुती सुझुकीची अल्टो K10 सर्वात स्वस्त सीएनजी आणि पेट्रोल व्हर्जन कार आहे. या कारवर देखील सप्टेंबर २०२३ मध्ये मोठी सूट दिली जात आहे. कारवर 58,000 रुपयांपर्यंत बंपर सूट दिली जात आहे. कारच्या बेस मॉडेलची किंमत 3.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे. या किमती एक्स शोरूम आहेत.

मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकीची स्विफ्ट कार सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार आहे. या कारवर कंपनीकडून 57,000 रुपयांची सूट दिली जात आहे. LXi मॅन्युअल आणि पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंटवर फक्त 52,000 रुपयांची सूट दिली जात आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे.