Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Cars Discount : मारुतीच्या ग्राहकांची लागली लॉटरी! या स्टायलिश कारवर मिळतेय 1 लाख रुपयांपर्यंत सूट, त्वरित घ्या फायदा

या दिवाळीमध्ये मारुतीकडून ग्राहकांना त्यांच्या कारवर आकर्षक सूट दिली जात आहे. तुम्हीही कार खरेदी करून १ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.

0

Maruti Cars Discount : देशात सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अशातच अनेकजण नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असतात. दिवाळीमध्ये तुम्हालाही कार खरेदीवर लाखो रुपयांची बचत करण्याची चांगली संधी आहे. मारुती सुझुकीकडून त्यांच्या अनेक कारवर १ लाख रुपयांपर्यंतची बंपर सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकी जिमनी

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या एकमेव ऑफ रोडींग कार जिमनी एसयूव्हीवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. या कारचा जबरदस्त लूक ग्राहकांना आकर्षित करत आहे.

या महिन्यात जिमनी एसयूव्ही कार खरेदी करून १ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.05 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी बलेनो

मारुती सुझुकीकडून त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक कार बलेनोवर आकर्षक सूट दिली जात आहे. तुम्ही या महिन्यात बॅलेनोकार खरेदी केली तर तुम्हाला कार खरेदीवर 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल.

या ऑफरमध्ये 20,000 रुपयांपर्यंत रोख सूट, 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलतचा समावेश आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.88 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी इग्निस

मारुती सुझुकीची इग्निस कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण कंपनीकडून त्यांच्या या कारवर 70,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. ही कार दिवाळीमध्ये खरेदी करून तुम्ही देखील 70,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.96 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी सियाझ

मारुती सुझुकीची लोकप्रिय सेडान कार Ciaz वर देखील ग्राहकांना नोव्हेंबर 2023 मध्ये आकर्षक सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ही कार खरेदी करून हजारोंची बचत करण्याची चांगली संधी आहे.

कंपनीकडून सियाझ कारवर 38,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.30 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.29 लाख रुपये आहे.