Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Cars Discount Offer : मारुती Fronx कारवर मिळतेय हजारोंची बंपर ऑफर! इथं पहा ऑफरबद्दल सर्वकाही

मारुती सुझुकी Fronx खरेदी करण्याची ग्राहकांकडे उत्तम संधी या महिन्यात आहे. कारण कंपनीकडून Fronx कारवर या महिन्यात आकर्षक हजारोंची सूट दिली जात आहे.

0

Maruti Cars Discount Offer : मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. मारुतीने भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक स्वस्त कार सादर केल्या आहेत. तसेच मारुती सुझुकी त्यांच्या अनेक नवीन कार सादर करणार आहे.

मारुती सुझुकीने २०२४ मध्ये त्यांच्या नवीन कार लाँच करण्यासाठी योजना आखली आहे. अलीकडेच मारुतीने जिमनी एसयूव्हीचे स्पेशन एडिशन सादर केले आहे. मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून देखील इयर एंड ऑफर दिली जात आहे.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये मारुती सुझुकीची कार खरेदी करायची असेल तर Fronx कारचा पर्याय उपलब्ध आहे. या कारवर कंपनीकडून या महिन्यात बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील हजारोंची बचत करू शकता.

मारुती सुझुकी Fronx किंमत

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या सर्वच कारच्या किमती अगदी कमी ठेवण्यात आल्या आहेत. Fronx कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.47 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.14 लाख रुपये आहे. Fronx कारवर या महिन्यात हजारोंची सूट दिली जात आहे.

मारुती फ्रॉन्क्स इंजिन

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून फ्रॉन्क्स कारमध्ये 1.2 लिटर NM लिटर आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असे दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि MT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे जे 89 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 99 bhp आणि 147 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. सिग्मा आणि डेल्टा या दोन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना सीएनजी पर्याय देण्यात येत आहे. ज्याची किंमत 8.41 लाख रुपये आहे.

मारुती फ्रॉन्क्स डिस्काउंट ऑफर

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या फ्रॉन्क्स कारवर डिसेंबर २०२३ या महिन्यात 25 हजारांची ऑफर दिली जात आहे. मारुती Fronx कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये विकली जात आहे. Fronx कार सिग्मा, डेल्टा, डेल्टा प्लस, झेटा आणि अल्फा अशा व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Fronx कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर ग्राहकांना 25 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. तसेच 15 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंटही देण्यात येत आहे. तसेच कारवर 10 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.