Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Cars Discount : अवघे काही दिवस शिल्लक! मारुती या कार्सवर देतेय 68 हजारांची बंपर सूट, असा घ्या त्वरित फायदा…

मारुती सुझुकीकडून नवरात्री उत्सव आणि पितृपक्षामध्ये त्यांच्या कारवर आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे या महिन्यात कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

0

Maruti Cars Discount : मारुती सुझुकीकडून त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या ऑक्टोबर महिन्यात मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुमच्याकडे मारुतीच्या कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या महिन्यात कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

नवरात्री उत्सव लवकरच सुरु होत आहे. तसेच दिवाळी काही दिवसांवर आली आहे. अशातच अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. त्यामुळे या नवीन कार खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी मारुतीकडून मोठी सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकीकडून नेहमीच कमी किमतीत शानदार कार्स सादर केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महिन्यात मारुतीची कार खरेदी करून तुम्ही 68 हजारांची बचत करू शकता.

Maruti Alto K10

मारुती सुझुकीकडून त्यांच्या Alto K10 या हॅचबॅक कारवर देखील मोठी सूट दिली जात आहे. या कारवर कंपनीकडून 68 हजार रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. पेट्रोल व्हेरियंटवर 53 हजार आणि सीएनजी व्हेरियंटवर 68 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

मारुती ब्रेझा

मारुती सुझुकीची ब्रेझा एसयूव्ही लोकप्रिय एसयूव्ही कारपैकी एक आहे. या महिन्यात ब्रेझा एसयूव्ही कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. ब्रेझा एसयूव्ही कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर 45 हजार रुपयांची आणि सीएनजी व्हेरियंटवर 20 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

मारुती एस-प्रेसो

मारुती सुझुकी एस-प्रेसो कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता कंपनीकडून कारवर मोठी सूट दिली जात आहे. तुम्हीही या महिन्यात एस-प्रेसो कार खरेदी करून 68 हजार रुपयांची बचत करू शकता. एस-प्रेसोच्या पेट्रोल व्हेरियंटवर 51 हजार रुपये आणि सीएनजी व्हेरिएंटवर 68 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

मारुती वॅगन आर

मारुती सुझुकी वॅगन आर कार खरेदी करण्याची देखील तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण या कारवर देखील मोठी सूट देण्यात येत आहे. वॅगन आर कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर 46 हजार रुपये आणि सीएनजी व्हेरिएंटवर 58 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

मारुती स्विफ्ट

मारुती सुझुकी स्विफ्ट ही देशातील लोकप्रिय सेडान कार आहे. या कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. स्विफ्टच्या पेट्रोल व्हेरियंटवर 47 हजार रुपयांची आणि सीएनजी व्हेरियंटवर 33 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

मारुती बलेनो

मारुती सुझुकी बलेनो कार गेल्या महिन्यात सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. सर्वाधिक कार विक्रीमध्ये मारुतीची बलेनो नंबर वन ठरली आहे. बलेनोच्या पेट्रोल व्हेरियंटवर 40,000 रुपयांपर्यंत सूट आणि सीएनजी व्हेरियंटवर 55,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.