Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Celerio : बजेट कमी आहे टेन्शन नाही… अवघ्या 50 हजारांत खरेदी करा मारुतीची 25 kmpl मायलेज देणारी Celerio कार…

मारुती सुझुकी शानदार हॅचबॅक कार खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण ही कार तुम्ही अवघ्या 50 हजारांत खरेदी करून घरी आणू शकता.

0

Maruti Celerio : मारुती सुझुकी नेहमीच कमी बजेटमध्ये शानदार हॅचबॅक कार सादर करत आहे. या हॅचबॅक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कारच्या किमती जास्त असल्याने अनेकांना अशा कार खरेदी करता येत नाहीत.

मात्र आता बजेट कमी असणारे ग्राहक देखील कमी पैशात स्टायलिश कार घरी आणायचे स्वप्न पूर्ण करू शकतात. मारुतीची शानदार हॅचबॅक कार Celerio अवघ्या ५० हजारांत घरी आणायची चांगली संधी आहे.

तुमचे बाजे कमी असेल आणि तुम्हाला मारुतीची Celerio कार खरेदी करायची असेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही ही कार अवघे ५० हजार रुपये डाऊनपेमेंट भरून घरी आणू शकता. Celerio कार खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे.

मारुती सेलेरियो LXI किंमत

मारुती सुझुकी सेलेरियो LXI कारवर फायनान्स ऑफर देण्यात येत आहे. सेलेरियो LXI हे बेस मॉडेल आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5,36,500 रुपये आहे. तर ऑन रोड किंमत 5,91,126 रुपयांपर्यंत जाते.

मारुती सेलेरियो LXI EMI योजना

मारुती सुझुकी सेलेरियो LXI कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ६ लाख रुपयांचे बजेट असायला हवे. मात्र इतके बजेट नसेल तर ही कार EMI पर्यायावर देखील उपलब्ध आहे. 50 हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरून ही कार घरी आणू शकता.

५० हजार रुपये डाउनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला बँकेकडून ५,४१,१२६ रुपयांचे कर्ज दिले जाईल. या कर्जावर तुमच्याकडून ९.८ टक्के वार्षिक व्याजदर आकारला जाईल. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा 11,444 रुपये मासिक EMI भरावा लागेल.

मारुती सेलेरियो LXI इंजिन तपशील आणि मायलेज

मारुती सुझुकी सेलेरियो LXI कारमध्ये 3-सिलेंडर 998cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5500 rpm वर 65.7 bhp पॉवर आणि 3500 rpm वर 89 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. पेट्रोलवर ही कार 25.24 Kmpl मायलेज देते असा दावा करण्यात आला आहे.