Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

बिनधास्त करा खरेदी! 35 किमी मायलेज अन् दमदार फीचर्ससह मारुतीच्या ‘या’ कारवर मिळत आहे 54 हजारांचा डिस्काउंट । Maruti Celerio Discount

मारुती सेलेरिओवर तब्बल 54 हजारांचा डिस्काउंट ऑफर देत आहे.  ज्याच्या तुम्ही फायदा घेत आता अगदी कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणारी मारुती सेलेरिओ घरी आणू शकतात.

0

Maruti Celerio Discount:  देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जुलै 2023  मध्ये 35 किमी मायलेज आणि दमदार फीचर्ससह येणाऱ्या लोकप्रिय कार मारुती सेलेरिओवर तब्बल 54 हजारांचा डिस्काउंट ऑफर देत आहे.  ज्याच्या तुम्ही फायदा घेत आता अगदी कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणारी मारुती सेलेरिओ घरी आणू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्ही या भन्नाट ऑफरचा फायदा फक्त 31 जुलै 2023 पर्यंत घेऊ शकणार आहे. चला मग जाणून घेऊया जुलै 2023 मध्ये मारुती सुझुकी मारुती सेलेरिओच्या कोणत्या व्हेरियंटवर किती डिस्काउंट देत आहे.

Celerio Manual Discount Offers

Celerio मध्ये BS6 फेज-II अनुरूप पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 66 bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. Celerio च्या मॅन्युअल व्हेरियंटमध्ये मारुती 25.24 kmpl च्या मायलेजचा दावा करते.

कॅश डिस्काउंट (VXi, ZXi, and ZXi+ व्हेरियंट)35,000 रुपये
कॅश डिस्काउंट (LXi)30,000 रुपये
एक्सचेंज बोनस15,000 रुपये

Celerio Automatic Discount Offers

Celerio चे 1.0-लिटर पेट्रोल इंजिन AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. जुलैमध्ये हे ऑटोमॅटिक व्हर्जन खरेदी केल्यास 10,000 रुपयांची कॅश डिस्काउंट मिळत आहे. या व्यतिरिक्त, या व्हेरियंटसह 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो.

Celerio CNG Discount Offers

Maruti Suzuki Celerio चे CNG व्हेरियंट 56 bhp पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Celerio CNG 35.6 kmpl चा मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

 कॅश डिस्काउंट (VXi, ZXi, and ZXi+ व्हेरियंट)30,000 रुपये
एक्सचेंज बोनस15,000 रुपये

Maruti Suzuki Celerio कॉर्पोरेट सवलत

Maruti Suzuki Celerio देखील निवडक व्हेरियंटवर 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सूटचा लाभ घेत आहे. यामुळे जर तुम्ही कमी किमतीमध्ये एक जबरदस्त फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणारी नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर Maruti Suzuki Celerio तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय सिद्ध होऊ शकते.