Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Celerio EMI Plan : कार खरेदीचे स्वप्न अवघ्या 0 रुपयांत होईल पूर्ण! दिवाळीत घरी आणा 35 Kmpl मायलेज देणारी मारुती Celerio

नवीन कार खरेदीचे स्वप्न आहे मात्र कमी बजेटमुळे ते पूर्ण करता येत नसेल तर काळजी करू नका. मारुती सुझुकी Celerio कार अगदी शून्य रुपयांच्या डाउनपेमेंटवर तुम्ही घरी आणू शकता.

0

Maruti Celerio EMI Plan : देशात दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. तुम्हालाही नवीन कार खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत असतील काळजी करू नका.

मारुती सुझुकी celerio कार तुम्ही शून्य रुपयांच्या डाउनपेमेंटवर घरी आणू शकता. कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज दिले जाईल. त्यानंतर तुम्ही अगदी आरामात कार घरी आणू शकता.

मारुती सुझुकी Celerio कारवर कंपनीकडून आकर्षक EMI पर्याय दिला जात आहे. एक रुपयाही न देता तुम्ही मारुती सुझुकी Celerio शानदार हॅचबॅक कार घरी आणू शकता. Celerio कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे लाखो रुपये असणे आवश्यक नाही.

मारुती सुझुकी Celerio व्हेरियंट आणि मायलेज

मारुती सुझुकीकडून त्यांची Celerio हॅचबॅक कार LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. कारच्या VXi व्हेरियंटमध्ये सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. Celerio सीएनजी कार दमदार मायलेज देण्यास सक्षम आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 25 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी व्हेरियंट 35 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Maruti Suzuki Celerio किंमत

मारुती सुझुकी अगदी कमी बजेटमध्ये शानदार कार सादर करत असते. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.14 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Celerio EMI Plan

मारुती सुझुकीकडून त्यांच्या Celerio कारवर EMI पर्याय देण्यात येत आहे. Celerio कारच्या बाइक्स मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरू होते. तर याच कारची ऑन रोड किंमत 5.90 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

ही कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही EMI वर ही कार अगदी सहज खरेदी करू शकता. शून्य रुपयांच्या डाउनपेमेंटवर ई कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. जर तुम्ही ही कार शून्य रुपयांमध्ये खरेदी केली तर ८ टक्के व्याजदराने ७ वर्षांसाठी कर्ज दिले जाईल.

कर्जाची परतफेड करण्यासाठी ९,२०१ रुपये दरमहा EMI भरावा लागेल. कर्जावर तुमच्याकडून 1,82,551 रुपये व्याज आकारले जाईल. 7 वर्षांत तुम्हाला एकूण 7,72,867 रुपये भरावे लागतील.