Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Ciaz Discount Offer : मारुतीची लक्झरी Ciaz कार खरेदीची अशी संधी पुन्हा नाही ! मिळतोय हजारोंचा बंपर डिस्काउंट, असा घ्या लाभ

0

Maruti Ciaz Discount Offer : देशातील कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या अनेक कारवर इयर एंड डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही देखील या ऑफरचा फायदा घेऊन हजारो रुपयांची बचत करू शकता. मारुती सुझुकी देखील त्यांच्या शानदार कारवर मोठी सूट देत आहे.

मारुती सुझुकी Ciaz सेडान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे. कारण Ciaz सेडान कारवर इयर एंड डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही Ciaz सेडान कार खरेदी करून हजारोंची बचत करू शकता.

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनी त्यांच्या लक्झरी फीचर्स Ciaz सेडान कारवर डिसेंबर 2023 मध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त बंपर सूट देत आहे. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे.

मारुती सुझुकी Ciaz किंमत

मारुती सुझुकीने त्यांची Ciaz सेडान कारमध्ये अगदी कमी किमतीत प्रीमियम फीचर्स दिले आहेत. Ciaz सेडान कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.30 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.45 लाख रुपये आहे.

Ciaz कारवर किती सूट?

Ciaz सेडान कारवर ग्राहकांना या महिन्यात 53,000 रुपयांपर्यंतची आकर्षक सूट देण्यात येत आहे. रोख सवलत म्हणून 25,000 रुपये, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. Ciaz सेडान कार सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा अशा चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

मारुती सुझुकी Ciaz इंजिन

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीने त्यांच्या आलिशान Ciaz सेडान कारमध्ये BS6 फेज-2 नुसार अपडेटेड 1.5-लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 103 bhp ची कमाल पॉवर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरशी जोडण्यात आले आहे.