Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

‘ही’ आहे कुटुंबासाठी सर्वात बेस्ट सेडान कार! जबरदस्त मायलेजसह किंमत फक्त 6.44 लाख रुपये। Maruti Dzire

ज्याच्या तुम्ही फायदा घेत अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये तुमच्या कुटुंबासाठी एक बेस्ट सेडान कार खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट सेडान कारबद्दल सविस्तर माहिती.

0

Maruti Dzire:  जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक बेस्ट सेडान कार शोधात असाल तर तुमचा हा शोध इथे संपणार आहे. आम्ही तुम्हाला या लेखात देशातील बाजारात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या एका मस्त सेडान कारबद्दल माहिती देणार आहोत.

ज्याच्या तुम्ही फायदा घेत अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये तुमच्या कुटुंबासाठी एक बेस्ट सेडान कार खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट सेडान कारबद्दल सविस्तर माहिती.

आम्ही तुम्हाला सांगतो देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रीमियम फीचर्स आणि पॉवरफुल इंजिनसह बाजारात Maruti Dzire ही सेडान कार लाँच केली आहे.

ज्याच्या सध्या बाजारात भरपूर रिस्पॉन्स मिळत आहे. यामुळे  जर तुम्हीही कमी बजेटमध्ये प्रीमियम सेडान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Maruti Dzire तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय सिद्ध होऊ शकते.

Maruti Dzire  इंजिन

कंपनीने ही प्रीमियम सेडान अनुक्रमे चार ट्रिममध्ये लॉन्च केली आहे: LXi, VXi, ZXi आणि ZXi+. यामध्ये उपलब्ध असलेल्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन बसवण्यात आले आहे. ज्यामध्ये 90PS च्या कमाल पॉवरसह 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. कंपनीने यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्याय दिला आहे. त्याच्या CNG व्हेरियंटच्या पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, ते 77PS पॉवर आणि 98.5Nm टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.

Maruti Dzire  मायलेज आणि किंमत

या कारमध्ये तुम्हाला व्हेरियंटनुसार वेगवेगळे मायलेज मिळते. कंपनीने 1.2L MT मध्ये 22.41 kmpl, 1.2L AMT मध्ये 22.61 kmpl आणि CNG MT मध्ये 31.12 km/kg मायलेजचा दावा केला आहे. या कारमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स आणि सुरक्षा मिळते. बाजारात त्याची सुरुवातीची किंमत 6.44 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जे टॉप व्हेरियंटसाठी 9.31 लाख रुपयांपर्यंत जाते.