Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Ertiga : Fortuner, Innova ला मागे टाकत मारुती Ertiga बनली नंबर 1 कार, केली रेकॉर्डब्रेक विक्री…

मारुती सुझुकीची Ertiga ७ सीटर कारच्या विक्रीमध्ये अव्वल स्थानी आहे. ऑगस्ट महिन्यात या कारची हजारो युनिट्स विक्री झाली आहेत. Fortuner, Innova सारख्या ७ सीटर कारला एर्टिगाने मागे टाकले आहे.

0

Maruti Ertiga : भारतात ७ सीटर कारला चांगली मागणी आहे. मोठ्या फॅमिलीसाठी अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे ७ सीटर कारच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. साध्य ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत.

अनेक ऑटो कंपन्यांकडून त्यांच्या ७ सीटर कार सादर केली जात आहेत. मारुती सुझुकीने ७ सीटर सेगमेंटमध्ये मजबूत पकड निर्माण केल्याचे दिसत आहे. Ertiga आणि XL6 या मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ७ सीटर कार आहेत.

मारुती सुझुकीच्या Ertiga कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारने Fortuner, Innova सारख्या तगड्या कारला देखील मागे टाकले आहे. Ertiga कार भारतातील नंबर १ ची ७ सीटर कार बनली आहे.

ऑगस्टमध्ये विक्री होणाऱ्या टॉप 7 सीटर

1. मारुती सुझुकी एर्टिगा – 12,315 युनिट्स
2. महिंद्रा स्कॉर्पिओ – 9,898 युनिट्स
3. महिंद्रा बोलेरो – 9,092 युनिट्स
4. टोयोटा इनोव्हा – 8666 युनिट्स
5. महिंद्रा XUV 700 – 6,512 युनिट्स
6. किया केरेन्स – 4,359 युनिट्स
7. मारुती XL6 – 4,184 युनिट्स
8. टोयोटा फॉर्च्युनर – 2,825 युनिट्स
9. रेनॉल्ट ट्रायबर – 1,821 युनिट्स
10. ह्युंदाई अल्काझार – 1,493 युनिट्स

एर्टिगाची सर्वाधिक विक्री

मारुती सुझुकीची एर्टिगा ही सर्वाधिक विक्री होणारी ७ सीटर कार आहे. मारुतीने एर्टिगा कारचे ऑगस्ट २०२३ मध्ये 12,315 युनिट्स विकले आहेत. तर दुसऱ्या नंबरवर महिंद्रा स्कॉर्पिओ आहे.

महिंद्राने त्यांच्या स्कॉर्पिओ कारचे ऑगस्ट महिन्यात 9,898 युनिट्स विकली आहेत. सर्वाधिक कार विक्रीत तिसऱ्या नंबरवर देखील महिंद्राची बोलेरो कार आहे. या कारची ऑगस्ट महिन्यात 9,092 युनिट्स विक्री झाली आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा किंमत, इंजिन आणि व्हेरियंट

मारुती सुझुकी एर्टिगा कार एकूण LXi, VXi, ZXi आणि ZXi+ सारख्या 4 मॉडेल्स आणि 9 व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या बजेटनुसार कारचे मॉडेल निवडू शकतात.

या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.46 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.11 लाख रुपये आहे. एर्टिगा कारमध्ये 1462 cc इंजिन देण्यात आले आहे. कारचे इंजिन 102 bhp पर्यंत पॉवर जनरेट करते. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे.