Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Ertiga : स्वस्तात कार खरेदीची संधी! अवघ्या 2 लाखात खरेदी करा मारुतीची ‘ही’ स्टायलिश 7 सीटर कार

तुमचे आता स्वस्तात कार खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मारुतीच्या कारवर ही ऑफर देण्यात आली आहे.

0

Maruti Ertiga : जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल आणि तुमचे कार खरेदीचे बजेट खूप कमी असेल तर काळजी करू नका. आता तुम्ही बाजारात असलेल्या मारुतीची सर्वात जास्त विकली जाणारी कार सहज खरेदी करू शकता. त्यामुळे तुमचे स्वस्तात कार खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.

आनंदाची बाब म्हणजे मारुतीची ही 7 सीटर कार आहे. कंपनीची ही एमपीव्ही कार असून Ertiga चे टॉप व्हेरियंट ZXI Plus ऑटोमॅटिक कार आहे. यात तुम्हाला इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ABS यांसारखी फीचर्स मिळतील.

इतक्या किमतीत करा खरेदी

अनेकजण कार सर्व रोख पैसे देऊन खरेदी करतात. परंतु जर तुमच्याकडे सर्व पैसे नसतील तर काळजी करू नका, कारण आता तुम्ही Maruti Suzuki Ertiga ZXI Plus Automatic ला फायनान्स द्वारे सहज करू शकता. तुम्हाला डाउन पेमेंटसाठी 2 लाख रुपये भरावे लागतील.

किमतीचा विचार केला तर या MPV ची एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख ते 13.08 लाख रुपये इतकी आहे. या पेट्रोल कारचे मायलेज 20.3 kmpl पर्यंत असून ती 7 रंगांच्या पर्यायांमध्ये विकली जाते. या MPV कारमध्ये मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल रिअर व्ह्यू मिरर, टचस्क्रीन, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ABS, अलॉय व्हील आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.

डाउन पेमेंट

तसेच Maruti Suzuki Ertiga ZXI Plus AT ऑटोमॅटिक वेरिएंटच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या कारची एक्स-शोरूम किंमत 13.08 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 15,16,288 रुपये इतकी आहे. जर तुमच्याकडे हे वेरिएंट खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर काळजी करू नका.

कारण आता तुम्ही मारुतीच्या या टॉप मॉडेलला 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करून फायनान्स केल्यास तुम्हाला 13,16,288 रुपये कर्ज मिळू शकते. समजा जर तुम्ही 5 वर्षांसाठी कर्ज घेत असल्यास तर व्याज दर 9% इतका असेल. त्याप्रमाणे तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 27,324 रुपये EMI म्हणून भरावे लागणार आहेत. जर तुम्ही कर्ज घेऊन ही कार खरेदी केली तर तुम्हाला 5 वर्षांमध्ये सुमारे 3.25 लाख रुपये व्याज द्यावे लागणार आहेत.