Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti eVX SUV : मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUVs सिंगल चार्जमध्ये देणार इतकी रेंज, मिळणार 60kWh शक्तिशाली बॅटरी पॅक

0

Maruti eVX SUV : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची अद्याप भारतीय ऑटो मार्केटमध्ये एकही इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आलेली नाही. मात्र 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुतीने त्यांची पहिली eVX इलेक्ट्रिक SUV सादर केली होती.

मारुती सुझुकी पुढील वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर करू शकते. तसेच 2025 पर्यंत मारुती पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते. यासोबतच कंपनीकडून यावेळी इलेक्ट्रिक कारच्या किमती देखील जाहीर केल्या जाऊ शकतात.

मारुतीची पहिली ईव्ही पुढील आर्थिक वर्षात लॉन्च होईल

मारुती सुझुकी त्यांची पहिली EV कार पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सादर करणार आहे. कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाणार आहे. त्यामुळे सिंगल चार्जमध्ये कार सर्वाधिक रेंज देण्यास सक्षम असेल.

या राज्यात तयार होणार eVX कार

मारुती सुझुकी त्यांची eVX इलेक्ट्रिक कार अहमदाबादपासून 90 किमी अंतरावर असलेल्या सुझुकी मोटर गुजरात हंसलपूर येतील प्लांटमध्ये तयार करणार आहे. या ठिकाणी मारुती Baleno, Swift, Dzire आणि Fronx सारख्या कार बनवते.

मारुती eVX कशी असेल?

मारुती सुझुकीची eVX इलेक्ट्रिक कार टोयोटाच्या 27PL स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाईल. कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाईल. मारुती सुझुकी eVX इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 550 ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असेल.

eVX इलेक्ट्रिक कारमध्ये 60kWh मजबूत बॅटरी पॅक दिला जाणार आहे. ही कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे. मारुती सुझुकीने त्यांच्या पहिली इलेक्ट्रिक कार लवकरात लवकर सादर करण्यासाठी वेगाने काम सुरु केले आहे.

मारुती EVX लुक आणि डिझाइन

मारुती सुझुकीने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली आहे. त्यामुळे कारचे डिझाईन समोर आले आहे. कारला स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न करण्यात डिस्ट्रिब्युटेड एलईडी हेडलाइट युनिट्सद्वारे फ्लँक-ऑफ ग्रिलसह समोरच्या बाजूला डिझाइन केले गेले आहे. सिल्व्हर स्किड प्लेट असलेले एलईडी फॉग लॅम्प देण्यात आले आहे.