Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti eVX SUV : मारुतीची पहिली EV कार कधी होणार लॉन्च ! सिंगल चार्जमध्ये देणार 550 km रेंज

0

Maruti eVX SUV : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची पहिली EV कार लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. मारुतीने त्यांची अद्याप एकही इलेक्ट्रिक कार लॉन्च केलेली नाही. 2023 ऑटो एक्स्पोमध्ये मारुतीने त्यांची eVX इलेक्ट्रिक भारतात प्रदर्शित केली होती.

मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. आता मारुती सुझुकी देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लवकरच प्रवेश करणार आहे. मारुती त्यांच्या पहिल्याच EV कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक पर्याय देणार आहे. 2024 च्या शेवटी किंवा 2025 च्या सुरुवातीला मारुती सुझुकी त्यांची eVX इलेक्ट्रिक भारतात लॉन्च करू शकते.

मारुतीने त्यांची eVX इलेक्ट्रिक कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर केल्यानंतर ही कार पुन्हा एकदा जपानमधील ऑटो शोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. मारुती सुझुकी eVX EV कारमध्ये 60kWh बॅटरी पॅक देऊ शकते.

सिंगल चार्जमध्ये ही कार सुमारे 550 किमी रेंज देण्यास सक्षम असू शकते. मारुतीची पहिली EV कार 4300 मिमी लांबीसह ग्रँड विटारा कारसारखीच असू शकते.

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाऊ शकते. EVX 2700 मिमी लांब व्हीलबेससह बाजारात सादर केली जाऊ शकते.

eVX इलेक्ट्रिक कारची किंमत देखील कमी ठेवली जाण्याची शक्यता आहे. मारुती गुजरातमधील हंसलपूर येथील प्लांटमध्ये EVX कारचे उत्पादन करू शकते. याच ठिकाणी टोयोटा त्यांची EV कार तयार करू शकते.

मारुती सुझुकीच्या सर्वच कार ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. मारुती सुझुकी कमी बजेटमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार सादर करत आहे.

त्यामुळे मारुतीच्या कार मध्यमवर्गीयांसाठी उत्तम पर्याय बनत आहेत. आता मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार देखील लोकप्रिय एसयूव्ही कारच्या यादीमध्ये स्थान मिळवू शकते.

इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ झाल्याने मारुती सुझुकी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केला जाण्याचा निर्णय घेतला आहे. EVX इलेक्ट्रिक कार आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असू शकते.