Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti First EV Car : मारुतीची पहिली EV कार देणार इतकी मोठी रेंज! लवकरच होणार लॉन्च

मारुती सुझुकी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार eVX लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. आता कंपनीकडून या कारची चाचणी देखील सुरु केली आहे. कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक दिला जाणार आहे.

0

Maruti First EV Car : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची भारतीय ऑटो मार्केटमध्ये अजून एकही इलेक्ट्रिक कार सादर केलेली नाही. लवकरच मारुती सुझुकी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. या कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक पर्याय दिला जाऊ शकतो.

मारुती सुझुकीने २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली होती. या कारचे डिझाईन देखील समोर आले आहे. मात्र कार कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. मात्र मारुतीकडून अद्याप इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये एकही कार लॉन्च केलेली नाही. मात्र २०२५ मध्ये मारुती सुझुकी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर करू शकते.

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार Suzuki eVX संकल्पनेवर आधारित असू शकते. ही कार जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच मारुती सुझुकी आगामी काळात त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार देखील सादर करू शकते.

मारुती सुझुकीची eVX इलेक्ट्रिक कार युरोपमध्ये चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. सर्वात प्रथम ही कार जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी त्यांच्या पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये 60 kWh बॅटरी पॅक देण्याची शक्यता आहे.

हा बॅटरी पॅक सिंगल चार्जमध्ये 550 किमीपर्यंत रेंज देण्यास सक्षम असू शकते. eVX इलेक्ट्रिक कारमध्ये फ्रंट व्हील ड्राइव्ह आणि सर्व व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन पर्याय मिळू शकतात.

Autocar

मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारमध्ये स्लीक एलईडी हेडलाइट्स, वाय-आकाराचे एलईडी डीआरएल, बंपरवर ठळक ब्लॅक क्लेडिंग, स्किड प्लेट, रुंद एअर इनलेट, क्षैतिज एलईडी लाइटिंग एलिमेंट कारमध्ये पाहायला मिळाले आहे.

मारुती eVX इलेक्ट्रिक कारची लांबी 4.3 मीटर, रुंदी 1.8 मीटर आणि उंची 1.6 मीटर असेल. इंटिरिअरमध्ये टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, मोठे HVAC व्हेंट्स, रोटरी डायल, पॅनोरॅमिक सनरूफ, टच-आधारित कंट्रोल्स देखील दिले जाईल.